winter session: हिवाळी अधिवेशनावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे सावट !

Maharashtra politics News : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. स्थानिक निवडणुका आणि डिसेंबर महिना बघता हे अधिवेशन एक आठवड्याचेच, होईल असे दिसून येते.
Nagpur Winter Session
Nagpur Winter SessionSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नागपूरमध्ये भरणारे हिवाळी अधिवेशन सरकारची परीक्षा बघणारे असते. मोठमोठ्या मोर्चांना सरकाराला सामोरे जावे लागले. विदर्भाचा विकास आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा या अधिवेशनातून आजवर मिळाला आहे. अधिवेशनाच्या कालावधीवरूनसुद्धा मोठे वाद होत असतात. मात्र यंदा जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे हे अधिवेशन सरकारला पुढे ढकलावे लागणार असल्याचे दिसून येते. तसे सुतोवाच भाजपचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. स्थानिक निवडणुका आणि डिसेंबर महिना बघता हे अधिवेशन एक आठवड्याचेच, होईल असे दिसून येते.

महायुती सरकारचे पहिले अधिवेशन नागपूरमध्ये भरले होते. मंत्रीमंडळाचा विस्ताराची घोषणाही नागपूरमध्ये झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी सर्व मंत्र्यांना नागपूरमध्येच मंत्रिपदाची शपथ दिली होती. मंत्रिमंडळाच्या यादीत नाव नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विद्यमान अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ अधिवेशन सोडून निघून गेले होते. तर तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर मोठे आरोप झाल्याने ते अधिवेशनाच्या शेवटच्याच दिवशी कामकाजात सहभागी झाले. भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नव्हता. अधिवेशनाच्या काळात ते नागपूरला होते. मात्र अधिवेशनाच्या कामकाजात त्यांनी सहभाग नोंदवला नाही. त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती.

Nagpur Winter Session
Pune BJP : फडणवीसांनी 'तो' निर्णय जाहीर करताच...पुण्यातील भाजप निष्ठावंतांचा सामुहिक राजीनाम्याचा इशारा

दोन आठवड्यांच्या या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी महायुती सरकारच्या संकल्पनाम्यातील सर्व आश्वासने पूर्ण केली जातील असे आश्वासन दिले होते. यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचासुद्धा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या आंदोलनामुळे कर्जमाफीचा विषय मार्गी लागला आहे. यासाठी शेतकऱ्यांना जून महिन्यापर्यंत वाट बघावी लागणार आठ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आली आहे.

Nagpur Winter Session
Shivsena Vs BJP Politics: एकनाथ शिंदे पक्षाने केली भाजपची गोची; यादीत शोधली २.९८ लाख संशयास्पद मतदार!

डिसेंबर महिन्यात महायुती सरकारची वर्षपूर्ती होत आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र याच दरम्यान नगर पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे आचारसंहिता सुरू राहणार आहे. सरकारलाही मोठ्या घोषणा करता येणार नाही. याकरिता अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

Nagpur Winter Session
Ashish Shelar news : भाजप आक्रमक! मविआ-मनसेच्या मोर्चानंतर सत्य-असत्याची लढाई; मंत्री शेलार करणार विरोधकांचे वस्त्रहरण

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात 8 डिसेंबर रोजी नियोजित करण्यात आले आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता अधिवेशनासाठी मनुष्यबळाची कमतरता जाणवू शकते. त्यामुळे अधिवेशन 8 ते 10 दिवस पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकार काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे.

Nagpur Winter Session
Sujay Vikhe Patil BJP : माझ्या ऑपरेशनमध्ये 'ठाॅय' होऊन जातो माणूस; सुजय विखेंच्या विधानानं खळबळ (Video)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com