Lok Sabha Election 2024 : राजकीय संघर्ष संपला? एकेकाळच्या कट्टर राजकीय विरोधकांची दिलजमाई; राणा-अडसूळ भेट...

Amaravati Lok Sabha Election 2024 : नवनीत राणांनी घेतली अडसूळांची भेट; राजकारणात कुणीही कायमचा मित्र वा शत्रू नसतो...
Amaravati Lok Sabha Election 2024 :
Amaravati Lok Sabha Election 2024 : Sarkarnama

Amaravati News : अमरावती लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. खासदार नवनीत राणा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते व माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यात कायमच राजकीय संघर्ष दिसून आला. राणा यांचा महायुतीत समावेश झाल्यानंतरी हा सुप्त संघर्ष सुरू होता. नवनीत राणा यांना भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर मात्र अडसूळांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. यामुळे राणा-अडसूळ यांच्यातल्या राजकीय विरोधाला आणखीनच धार आली होती. आता मात्र राणा दाम्पत्यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अडसूळ यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Latest Marathi News)

राणा दाम्पत्याने अचानकपणे अडसूळ यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेतली. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या भेटीनंतर आता राणा - अडसूळ हा राजकीय वाद संपला आहे का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर वेळोवेळी आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजित अडसूळांनी आक्षेप घेतला होता. याविरोधात ते न्यायालयातही गेले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amaravati Lok Sabha Election 2024 :
NCP News: दक्षिण महाराष्ट्रातून ‘घड्याळ’ गायब ; पुणे जिल्ह्यात दोनच ठिकाणी उमेदवार रिंगणात

या भेटीनंतर आमदार रवी राणा म्हणाले, "भाजपच्या चार सौ पारचा नारा पूर्ण करण्यासाठी या उद्देशाने आम्ही काम करत आहोत. त्याच अनुषंगाने आम्ही ही भेट घेतली. मोदीजी (Narendra Modi) आणि भाजपच्या ध्येयधोरणाशी विकासाच्या धोरणाला जो साथ देईल आम्ही त्यांना सोबत घेऊन ही लढाई लढत आहोत. राजकारणात कुणीही कायम शत्रू आणि मित्र नसतो. राजकीय समीकरण त्यावर होणारे युती आघाड्या ह्या खरं तर लोककल्याणासाठी असतात," असेही ते म्हणाल्या.

Amaravati Lok Sabha Election 2024 :
Anandraj Ambedkar News : आनंदराज आंबेडकरांची कोलांटउडी; म्हणाले, 'निवडणूक लढवणारच!'
Amaravati Lok Sabha Election 2024 :
Navneet Rana Net Worth : नवनीत राणा पतीपेक्षाही श्रीमंत, पाच वर्षांत संपत्तीत 'एवढ्या' टक्क्यांनी वाढ

अभिजित अडसूळ म्हणाले...

रामनवमीचा मुहूर्त साधून खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी घरी येऊन सदिच्छा भेट घेतली. भाजपच्या उमेदवार म्हणून आम्ही त्यांचे औक्षण केले आहे. सध्या आम्ही सर्व पदाधिकारी मिळून पुढची दिशा ठरवत आहोत. कार्यकर्त्यांच्या मताला महत्त्व आहे. त्यांचे म्हणणे काय आहे, त्याबाबत लवकरच भूमिका जाहीर करू, असे अभिजित अडसूळ म्हणाले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com