Lok Sabha Election 2024 : शिवानी वडेट्टीवारांचा भेटींचा धडाका, चंद्रपुरात पुन्हा होणार वडेट्टीवार - धानोरकर संघर्ष !

Vijay Wadettiwar : बाहेर पक्षातून आलेले उमेदवारी मागू शकतात तर शिवानी यांनी उमेदवारी का मागू नये, असे विधान विजय वडेट्टीवार यांनी केले.
Pratibha Dhanorkar, Vijay Wadettiwar and Shivani Wadettiwar
Pratibha Dhanorkar, Vijay Wadettiwar and Shivani WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम केव्हाही जाहीर होऊ शकतो. याकरिता आता विविध पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपला कुठल्याही परिस्थितीत कमबॅक करायचं आहे. तर काँग्रेसला विजयाची परंपरा कायम ठेवायची आहे. दोन दिवसांपूर्वी युवक काँग्रेसच्या महासचिव शिवानी यांनी युवा नेतृत्वाला पक्षाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात संधी द्यावी, मी लढण्यास तयार आहे, असे वक्तव्य केले.

गेल्या अनेक वर्षांपासून आपण पक्षासाठी सातत्याने काम करीत आहोत. पक्ष म्हणेल तर पूर्ण ताकदीनिशी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची जागा जिंकून आणू, असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली. शिवानी वडेट्टीवार यांनी उमेदवारीची मागणी केल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी शिवानी यांनी रास्त मागणी केल्याचे म्हटले आहे. शिवानी गेल्या 10 वर्षापासून सातत्याने पक्षाचे काम करीत आहेत. प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. पक्ष जो निर्णय घेईल, तो मान्य असेल, असेही वडेट्टीवार म्हणाले होते.

दुसऱ्या पक्षांतून आलेले जर उमेदवारी मागत असतील तर शिवानी वडेट्टीवारांच्या मागणीत गैर काय, असे म्हणत त्यांनी प्रतिभा धानोरकरांवर नान न घेता प्रहार केला. दरम्यान विजय वडेट्टीवारांच्या या विधानानंतर शिवानी यांनी अनेकांच्या भेटी घेण्याचा धडाका लावला आहे. त्यांनी नागपुरातील विविध वृत्तपत्रांच्या संपादकांच्या भेटी घेतल्या. चंद्रपुरातील अनेक मान्यवरांच्या घरी जात त्यांना त्या आपली भूमिका पटवून देत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pratibha Dhanorkar, Vijay Wadettiwar and Shivani Wadettiwar
Vijay Wadettiwar : बच्चू कडू हा गुलाम बनणारा नव्हे, तर मर्द माणूस, पण…

काँग्रेस व समविचारी पक्षांतील नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. एकाच दिवसात त्यांनी चंद्रपुरात अनेकांच्या निवासस्थानी भेटी दिल्या. मागील लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे बाळू धानोरकर यांनी विजय मिळविला होता. तब्बल चारदा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे हंसराज अहीर यांचा त्यांनी पराभव केला होता. हा पराभव अहीर व भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला. आता कुठल्याही स्थितीत चंद्रपूर मतदारसंघ काबीज करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

आमदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा चंग बांधला आहे. त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. अशात आता शिवानी वडेट्टीवार उमेदवारीच्या रेसमध्ये उतरल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्या ॲक्शन मोडवर आहेत. नुकतीच त्यांनी चंद्रपुरातील मान्यवरांची भेट घेऊन आपली भूमिका सांगितली व त्यांच्याकडून मार्गदर्शनदेखील घेतले.

प्रतिभा धानोरकर यांच्यानंतर आता शिवानी वडेट्टीवार यांनी उमेदवारी मागितल्याने उमेदवारीसाठी त्यांच्यातील उघड संघर्ष येत्या दिवसात बघायला मिळणार आहे. बाहेर पक्षातून आलेले उमेदवारी मागू शकतात तर शिवानी यांनी उमेदवारी का मागू नये, असे विधान विजय वडेट्टीवार यांनी केल्यानंतर आता वडेट्टीवार-धानोरकर यांच्यातील राजकीय संघर्षाची सुरुवात झाली आहे. आगामी दिवसांत याबाबत कोणते राजकीय संदर्भ बदलतात, याकडे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Edited By : Atul Mehere

Pratibha Dhanorkar, Vijay Wadettiwar and Shivani Wadettiwar
Vijay Wadettiwar : ‘त्यांची’ ‘गॅरंटी’ काय? वडेट्टीवारांचा मोदींना टोला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com