Navneet Rana : नवनीत राणांचा नवा नारा, 'मी मैदानात परत येईल...'

Navneet Rana defeat Lok Sabha : माझ्या पराभवामुळे अनेकांना आनंद झाला आहे. मात्र, वेगळ्याच गोष्टीचे मला दुःख आहे. माझी अमरावती 10 वर्षे मागे जात आहे हे पाहून मला खूप वेदना होत आहेत, असे नवनीत राणा म्हणाल्या.
Navneet Rana
Navneet RanaSarkarnama
Published on
Updated on

Navneet Rana News : लोकसभा निवडणुकीतील पराभव नवनीत राणा यांच्या चांगलाच चिव्हारी लागलाय. निकालाच्या दीड महिन्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात नवनीत राणा यांनी आपली खंत बोलून दाखवली. मेरीटचा विद्यार्थी कमी मार्काने नापास झाला तर त्याचे दु:ख तेच सांगू शकतो, असे राणा म्हणाल्या.

'मला असं वाटतंय मी कमी पडली असेल. पण मी परत तयारी करेल आणि या मैदानात परत येईल.', असे नवनीत राणा यांनी ठणकावून सांगितले.

माझ्या पराभवामुळे अनेकांना आनंद झाला आहे. मात्र, वेगळ्याच गोष्टीचे मला दुःख आहे. माझी अमरावती 10 वर्षे मागे जात आहे हे पाहून मला खूप वेदना होत आहेत, असे सांगत लौटेंगे फिर एक दिन उसी अंदाज में! कई बादल छाने से सूरज का अस्तित्व खत्म नहीं होता, अशी शेरोशायरी नवनीत राणा Navneet Rana यांनी केली.

Navneet Rana
Aditya Thackeray Vs MNS : आदित्य ठाकरेंना रोखण्यासाठी 'मनसे' तयारी; संदीप देशपांडे झुंज देणार?

विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात आमदार रवी राणा यांनी आपल्या सगळ्याच्या मनातल्या खासदार पण आता त्या माजी झालेल्या आहेत, असे म्हणत नवनीत राणांचा उल्लेख केला. नवनीत राणा यांच्या पराभवासाठी सगळे नेते एकत्र झाले आणि त्यांनी नवनीत राणा यांना थांबवलं, असे देखील रवी रवी Ravi Rana राणा म्हणाले.

विकासाचे व्हिजन थांबवले

नवनीत राणांना थांबवत अमरावती जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन थांबवले. दिल्लीतला कोणताच असा नेता नव्हता की ज्याचा वेळ नवनीत राणा यांच्या एका फोनवर मिळत नव्हता. आज पार्लमेंटमध्ये चेहेरा मजबूत नसेल, चेहऱ्यामध्ये ताकद असेल तर निधी खेचून आणू शकतो.

Navneet Rana
BJP Politics : सांगली, पुण्यावर भाजपचे प्रेम का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com