Prakash Ambedkar News : '...तर काँग्रेसने रिंगणातून बाहेर पडावे', ॲड. प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

Loksabha Election 2024 : काँग्रेसवाले कितीही म्हणाले तरी आज त्यांची लढण्याची ताकद संपली आहे, महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये मॅच फिक्सिंग झाली आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.
Prakash Ambedkar News
Prakash Ambedkar News Sarkarnama

Loksabha Election : तुषार गांधी यांनी वंचितला मतदान करू नका, असे आवाहन केले होते. वंचितमुळे भाजपलाच फायदा होत आहे, असा दावा देखील तुषार गांधी केला होत. त्या दाव्याला प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांनी काँग्रेस भाजपशी लढू शकत नाही, असे म्हणत प्रत्युत्तर दिले होते. मात्र, काँग्रेलवाले भित्रे आहेत असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधला आहे.

'शाम मानव, तुषार गांधी आरोप करत आहेत. मी अनेक नावं घेऊ शकतो की, जे म्हणत आहेत हे उभे कसे राहिले. आम्ही पक्ष म्हणून उभे राहिलो आहोत. तुम्हाला वाटत असेल, की भाजप हरली पाहिजे. तर काँग्रेसवाल्यांनो रिंगणातून बाहेर पडा. भाजपसोबत (BJP)दोन हात करून आम्ही मोकळं होवू, तुमच्यासारखे आम्ही भित्रे नाही. आम्ही मोदीची (Narendra Modi) ताकद उखडून टाकायला निघालो आहोत. आम्ही त्यांना उघडे पाडत आहोत. जे तुम्ही करायला पाहिजे ते आम्ही करत आहोत', असा दावा प्रकाश आंबेडकर रामटेक मतदारसंघातील प्रचारसभेत केला.

Prakash Ambedkar News
Prakash Ambedkar News : काँग्रेसला कधीही दोनपेक्षा अधिक जागा वंचितला द्यायच्याच नव्हत्या, प्रकाश आंबेडकरांचा आरोप !

काँग्रेसवाले कितीही म्हणाले तरी आज त्यांची लढण्याची ताकद संपली आहे, महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये मॅच फिक्सिंग झाली आहे. दिल्लीत राहुल गांधी यांनी मॅच फिक्सिंग हा शब्द मोदी आणि निवडणूक आयोगासंदर्भात वापरला होता. पण महाविकास आघाडीने तो प्रत्यक्षात महाराष्ट्रात उतरवला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना (ठाकरे गट) यांनी जो उमेदवार दिला, त्या उमेदवाराला कल्याणची माणसं म्हणत आहेत की, हा उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात लढू शकत नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

काँग्रेसचे नाना पटोले यांचे नाव भंडारा गोंदियामधून जाहीर झाले. काँग्रेसने नांदेडमध्ये चव्हाण नावाचा उमेदवार उभा केला जो आठवड्यातून तीन दिवस डायलेसिसवर असतो, तो तब्येत सांभाळणार की, प्रचार सांभाळणार ? मी अनेक उदाहरणे देऊ शकतो, यांच्या मनात चौकशीची भीती आहे. महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात मॅच फिक्सिंग झाली आहे, असा हल्लाबोल प्रकाश आंबेडकरांनी केला.

Prakash Ambedkar News
Loksabha Election 2024 : ...अन् मशिदीतही घुमला 'मोदी है तो मुमकिन है'चा नारा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com