Loksabha Election 2024 : ' वंचित आणि भाजप यांच्यातच लढत', प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना पत्र

Prakash Ambedkar News : कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याबद्दल तसेच अतूट निष्ठा आणि पक्षासाठी केलेल्या अखंडित कामाबद्दल आभार मानण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar sarkarnama

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील विदर्भातील पाच जागांवरील मतदान 19 एप्रिलला होणार आहे. वंचितनेदेखील सर्वच जागांवर उमेदवार दिले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढत होणार आहे. मतदानाच्या तीन दिवस आधी मंगळवारी (ता.16) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून पत्र लिहले आहे. या पत्रातून निवडणूक लढती फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि भाजप यांच्यात आहे, असा दावा आंबेडकर यांनी केला आहे.

Prakash Ambedkar
Lok Sabha Election News : पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या; पाच मतदारसंघांत शुक्रवारी मतदान

कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याबद्दल तसेच अतूट निष्ठा आणि पक्षासाठी केलेल्या अखंडित कामाबद्दल आभार मानण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. आपल्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका. महाराष्ट्रातील ही लढाई फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि भाजप (BJP) यांच्यात आहे, असे आवाहनदेखील आंबेडकरांनी आपल्या पत्रातून केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीवर टीका

'शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले आहेत. महाराष्ट्रात भाजप उमेदवार शोधण्यासाठी धडपडत आहे आणि महाराष्ट्रातील जागावाटपावरून मित्रपक्षांशी संघर्ष करत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते आणि अनेक वरिष्ठ नेते त्यांच्या प्रदेशाध्यक्षांविरोधात उघडपणे बंड करत आहेत,' असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar ) महाविकास आघाडीवर टीका केली.

पाठिंब्यासाठी काँग्रेसची विनंती?

महाराष्ट्रातील उलटसुलट राजकीय परिस्थिती पाहता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी या लढाईमध्ये संपूर्ण ताकदीने लढण्यास सक्षम आहे. यामुळेच काँग्रेसलाही मतदारांमधील आमची लोकप्रियता कळते आणि म्हणून आम्हाला त्यांच्या दिल्लीत बसलेल्या काँग्रेसच्या हायकमांडने नागपुरातील त्यांच्या उमेदवारासाठी पाठिंबा देण्याची विनंती केली, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

R

Prakash Ambedkar
Ravikant Tupkar News : "तुमचीच तंबाखू, तुमचाच चुना, मला फक्त निवडून आणा, हाच जाधवांचा धंदा," रविकांत तुपकर बरसले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com