Loksabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदर्भात सभा झाल्या होत्या. या सभांमध्ये त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली होती. राहुल गांधी यांची आज (शनिवारी) भंडाऱ्यामध्ये सभा झाली. या सभेत राहुल गांधी मोदींना प्रत्युत्तर दिले. महागाई, बेरोजगारी, जातजनगणना या मुद्द्यांवर राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना लक्ष्य केले.
'मी भारत जोडो यात्रेत चार हजार किलोमीटर चाललो. या यात्रेत हजारो लोकांशी बोललो. लोकांना बेरोजगारी, महागाईसारखे प्रश्न सतावत आहेत. मात्र, नरेंद्र मोदी गरिबांच्या खिशातून पैसे काढून आपले मित्र अदानींच्या खिशात घालत आहेत. देशातील 70 कोटी लोकांकडे जेवढी संपत्ती आहे. तेवढी संपत्ती देशातल्या 22 लोकांकडे आहे. नरेंद्र मोदींनी (Narendra modi) या मोठ्या 22 करोडपतींना 16 लाख कोटी रुपये दिले, असा घणाघात राहुल गांधींनी (Rahul Gandhi) नरेंद्र मोदींवर केला.
हे मोदीचं सरकार नव्हे अदानीचे सरकार आहे. मोदी बेरोजगारी, महागाईबाबत बोलायला तयार नाहीत. पूजा करताना पाण्याखाली जातात तेथे सोबत पंडित पण नाही. एकटेच पूजा करतायेत. हवेत जातात. कोरोना काळात लोक मरत असताना पंतप्रधान थाळ्या वाजवायला सांगत होते, असा टोला राहुल गांधींनी लगावला.
महिलांना वर्षाला एक लाख रुपये तर महिन्याला आठ हजार 500 रुपये देण्याची गॅरंटी दिली. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर जातजनगणना करणार, अग्निवीर योजना बंद करणार, छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देणार, असे आश्वासन राहुल गांधींनी आपल्या भाषणात दिले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.