Buldhana Mahabeej News: कामगार मंत्र्यांच्याच जिल्ह्यात कामगारांवर मोठा अन्याय..! 'महाबीज'च्या 35 वर्षांपासूनच्या कामगारांना अचानक काढलं...

Mahabeej Project: एकीकडे दुष्काळामुळे रोजगाराचे संकट, तर दुसरीकडे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड, कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे आणि सन्मानाची वागणूक द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
Minister Akash Fundkar
Minister Akash Fundkar Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Buldhana News: राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या जिल्ह्यातूनच एक गंभीर बाब समोर येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातच कामगारांच्या पिळवणुकीचा गंभीर आरोप करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. चिखली येथील महाबीज प्लांटवर तब्बल 35 वर्षांपेक्षा अधिक काळ काम करणाऱ्या महिला आणि पुरुष कामगारांना अचानक कामावरून कमी करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.

महाबीज प्रकल्पात रोजणदारीवर कामाला असलेल्या संबंधित कामगारांनी जिल्हा व्यवस्थापकांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. नियमाप्रमाणे मजुरी न देता कमी पैसे देऊन मस्टरवर सह्या घेतल्या जातात, तसेच पीएफचाही लाभ मिळत नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. त्यातच बुलढाणा जिल्हा व्यवस्थापकांकडून 'तुम्हाला कामावर घेणार नाही, कुठे जायचे ते जा' अशा धमक्या दिल्या जात असल्याचा कामगारांचा दावा आहे.

एकीकडे दुष्काळामुळे रोजगाराचे संकट, तर दुसरीकडे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड, कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे आणि सन्मानाची वागणूक द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. विशेष म्हणजे, कामगारांच्या या गंभीर प्रश्नावर महाबीजचे अधिकारी मात्र चकार शब्द काढण्यास तयार नसल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे संबंधित कामगारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे...

यावर चिखली येथील महाबीजच्या प्रकल्पात रोजंदारीवर कामाला असलेले प्रदीप बांबल म्हणाले, आमची एकच मागणी आहे की, आम्हांला 23 तारखेला कामावरुन का कमी केलं, आम्हांला परत कामावर घ्या. दुष्काळाची परिस्थिती असताना बेरोजगार न करता रोजगार द्यावं असंही म्हटलं.

Minister Akash Fundkar
Karnataka Panchayat Election : इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा! जिल्हा, तालुका पंचायत निवडणुकांचा मार्ग मोकळा; कर्नाटकात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू

याबाबत आम्ही आमदार साहेबांकडे गेलो होतो. त्यांनी वेळोवेळी आम्हांला सहकार्य केलं. पण त्यांनी ज्याज्यावेळी फोन करतात, तेव्हा महाबीज प्रकल्पाशी संबंधित स्थानिक अधिकारी त्यांना चुकीची उत्तरं देतात आणि त्यांची दिशाभूल करतात असा आरोपही कामगार बांबल यांनी यावेळी केला. आम्हांला प्रश्न पडतो की, आम्ही नेमकं कोणाकडं जावं,असंही त्यांनी सांगितलं.

महाबीजचे ठाकरे नावाचे जे अधिकारी आहेत, ते माझ्या कामगारांना म्हणाले की, तुमचं बरं-वाईट करणं हे माझ्याच हातात आहे. त्यांची 30 नोव्हेंबरला रिटायरमेंट आहे, त्यामुळेच त्यांनी आम्हांला 23 तारखेपासून कमी केलं असल्याचंही प्रदीप बांबल यांनी म्हटलं आहे.

याचदरम्यान, कामावरुन कमी केलेली एक महिला म्हणाली, त्यांनी आम्हांला एकच धमकी दिली आहे की, तुम्हांला कामावर घेतलं जाणार नाही. तुम्हांला काम भेटणार नाही.चारशे रुपये रोज आम्हांला कबूल केला. त्यात साडेतीनशे न देता आम्हांला तीनशे दिला. त्यामुळे आमची वादावादी झाली असंही त्यांनी म्हटलं. तसेच आमच्या हक्काचं काम आम्हांला मिळायलाच हवं अशी मागणीही संबंधित महिलेनं केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.