
Nagpur News, 02 May : महायुती सरकारने आपल्या पहिल्या शंभर दिवसांचे रिपोर्ट कार्ड सादर केले आहे. महिला व बाल कल्याण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कृषि खाते सरकारच्या परीक्षेत मेरिटमध्ये आले आहेत.
मात्र, शंभर दिवसात जनतेचा अपेक्षा भंग झाला आणि खोक्या तसेच बेताल वक्तव्य करणारे मंत्री या काळात पहायला मिळाल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन झाले तेव्हाच सर्व मंत्र्यांना शंभर दिवसांचे टार्गेट दिले होते.
प्रत्येक खात्याने नागरिकांना काय काय सुविधा निर्माण केल्या, कुठली कामे केली, काय सुधारणा केली याची माहिती मागितली होती. त्यानुसार गुण देण्यात आले. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांच्या कामाचे ऑडिट करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावरच अडीच वर्षानंतर मंत्रिमंडळात फेरबदल केले जातील असेही स्पष्ट केले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अडीच वर्षांचा फॉर्म्युला जाहीर केला होता. अडीच वर्षानंतर इतरांना संधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे शंभर दिवसांच्या टार्गेटकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधून मंत्र्यांच्या खात्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया देत सरकारवर टीका केली.
सरकार स्थापन झाल्यापासून अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप सुरू झाले. त्यांचा राजीनामा घ्यावा लागला. त्यांच्याच बीड जिल्ह्यातील गुंडगिरी जनतेला बघायला मिळाली. आका आणि बोक्या उदयास आले. ज्या खात्याने चांगली कामगिरीचे पारितोषिक देले त्या कृषी खात्याने मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बेताल वक्तव्य चांगलेच गाजले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषिमंत्र्यांना तंबी दिली होती. आका व खोक्याच्या सरकारने जनतेचा अपेक्षाभंग केल्याचा आरोप यावेळी सपकाळ यांनी केला. काँग्रेसने संघटन वर्ष जाहीर केले आहे. त्यानुसार आवश्यक बदल सुरू करण्यात आले आहे. संघटन वर्ष असल्याने फेरफार आणि आवश्यक बदल वर्षभरात होणार असल्याचंही हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.