Mahayuti News : स्थानिकच्या निवडणुकीचा पत्ता नाही; मतदारांच्या इच्छेचा अपमान करत महायुतीकडून पक्षफोडीवर भर, नेमकं गणित काय?

Mahayuti Politics : महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना व शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष फोडला जात आहे. त्या तीन पक्षातील अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, स्थानिक नेते सत्ताधाऱ्यांच्या पक्षात सामील होत आहेत.
Mahayuti government meeting
Mahayuti government meetingSarkarnama
Published on
Updated on

Mumbai news : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गेल्या चार वर्षांपासून रखडल्या आहेत. कोरोनाचे संकट आल्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला ब्रेक लावण्यात आला. राज्यातील नगरपालिकेच्या निवडणुका नोव्हेंबर 2021 मध्ये होणे अपेक्षित होत्या. तर राज्यातील 13 महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका मार्च 2022 पासून झाल्या नाहीत. त्यानंतर टप्याटप्याने मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडलेल्या आहेत.

या निवडणुका येत्या काळात कधी होणार हे निश्चित नसतानाही महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक पातळीवरील महाविकास आघाडीचे बालेकिल्ले उध्वस्त करण्याचा धडाका लावला आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना व शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष फोडला जात आहे. त्या तीन पक्षातील अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, स्थानिक नेते सत्ताधाऱ्यांच्या पक्षात सामील होत आहेत.

निवडणुकांबाबत अनिश्चिततेची प्रमुख कारणे

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चार वर्षांपासून अधिककाळ झाल्या रखडलेल्या आहेत. त्यासाठी प्रभाग रचना व न्यायालयीन प्रकरणे रखडले आहेत. काही जणांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून कोर्टात धाव घेतली आहे. त्यावर कोर्टात सुनावणी सुरु आहे. अजून पूर्णतः निकाल लागलेला नाही. त्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून चालढकल केली जात आहेत. त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभावही दिसत आहे. निवडणुका लांबवून सत्ताधाऱ्यांकडून पक्षबांधणी केली जात आहे. गेल्या काही दिवसापासून निवडणूका होत नसल्याने दुसरीकडे मात्र नेतेमंडळीत नाराजी दिसून येत आहेत.

Mahayuti government meeting
Pakisatan Richest Man Deepak Perwani : भारतीय वंशाचा पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत माणूस; गिनीज वर्ल्ड बुकमध्येही नाव

महायुतीची रणनीती पक्षफोडीवर भर

आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची सत्ताधारी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात तयारी केली जात आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीतील कॉंगेस (Congress), शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या विरोधी पक्षातील स्थानिक नेत्यांना आपल्या गटात सामावून घेतले जात आहे. त्यासाठी सत्ताधारी मंडळी सत्तेचा वापर करून वेळप्रसंगी दबाव तंत्राचा वापर करत आहेत. त्यासाठी वेगवेगळी आश्वासने दिली जात आहेत तर काही जणांना निधीच्या आशेवर नेतृत्त्व बदल घडवून आणला जात आहे. त्यामधून सत्ताधारी पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणुकांपूर्वीच नेतेमंडळींना फोडत स्थानिक संस्था काबीज करण्याचा डाव आखला जात आहे.

Mahayuti government meeting
India Vs Pakistan War : पहलगाम हल्ल्यानंतर युद्धाचे ढग, पाकिस्तानला 57 मुस्लिम देशांचा पाठिंबा

मतदारांच्या इच्छेचा अपमान

या सर्व फोडाफोडीच्या प्रकारचा लोकशाहीवर परिणाम होत आहे. हे निवडून दिलेले प्रतिनिधी पक्ष बदलत असतील तर हा एक प्रकारे मतदारांच्या इच्छेचा अपमान आहे. सत्ताधारी मंडळी गैरमार्गाचा अवलंब करून राजकीय अस्थिरता वाढवत आहेत. त्यांनी निष्ठा बदलल्याने भविष्यकाळात सत्ता गमावण्याचा धोका आहे. या सर्व प्रकारचा विकासावर अनिश्चित परिणाम होत आहे. येत्या काळात महायुतीने राज्यात सत्ता मिळवली तरी कामाची गुणवत्ता निश्चित नाही.

Mahayuti government meeting
Ajit Pawar Politics : अजित पवारांच्या पक्षात होत असलेले मातब्बरांचे प्रवेश वाढवणार शिंदे गटाची डोकेदुखी?

राज्यात महायुतीने (Mahayuti) पक्षफोडीची रणनीती अवलंबली आहे. ही रणनीती अल्पकालीन फायद्याची असली तरी लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकर आणि पारदर्शकपणे व्हाव्यात, हीच खरी लोकशाहीची गरज आहे. सत्ता ही जनतेच्या मताने मिळवलेली असावी, राजकीय डावपेचांनी नव्हे, अशीच सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

Mahayuti government meeting
Pooja Khedkar Controversy : नऊ महिन्यानंतर पूजा खेडकर आली समोर; खोटे दिव्यांग प्रमाणपत्र, ओबीसी दाखला अन् 'त्या' आरोपांवर स्पष्टच बोलली

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चार वर्षांपासून रखडलेल्या आहेत. त्यासाठी प्रभाग रचना, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही जणांनी कोर्टात धाव घेतली आहे. त्यावर कोर्टात सुनावणी सुरु आहे. त्यामुळे यावर सुनावणी होणे बाकी आहे. मे महिन्यात सुनावणी होऊन निकाल लागला तरी येत्या काळात निवडणुका लवकर होणे अवघड आहे. जून ते सप्टेंबर महिन्यात पावसाळा असल्याने निवडणुका होणे अशक्य आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबर महिन्यात होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आता या निवडणुका कधी होणार याकडे इच्छुक मंडळींचे लक्ष लागले आहे.

Mahayuti government meeting
Dharashiv BJP District President : धाराशिव भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच; कोणाची वर्णी लागणार उत्सुकता शिगेला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com