Maharashtra Budget : गडचिरोलीला स्टील हब ते अकोल्याला विमानतळ; CM फडणवीसांनी विदर्भाला दिल्या '9' प्रमुख गोष्टी

Devendra Fadnavis : मुख्यमंत्रीपदी विदर्भाचे सुपुत्र देवेंद्र फडणवीस असल्याने विदर्भाला अर्थसंकल्पात यंदा काय मिळते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते.
Devendra Fadnavis, Vidarbha
Devendra Fadnavis, VidarbhaSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत राज्याच्या अर्थसंकल्पात सादर केला. यात विदर्भासाठी विविध महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. यात गडचिरोलीला स्टील हब बनविण्यापासून अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे मराठी भाषा संशोधन केंद्र सुरू करण्यापर्यंतच्या अनेक महत्वाच्या घोषणांचा समावेश आहे. मुख्यमंत्रीपदी विदर्भाचे सुपुत्र देवेंद्र फडणवीस असल्याने विदर्भाला अर्थसंकल्पात यंदा काय मिळते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते.

■ गडचिरोलीला स्टील हब बनविणार :

गडचिरोली जिल्ह्याला 'स्टील हब' म्हणून विकसित करण्यात येणार. यासोबतच दळणवळणासाठी खनिकर्म महामार्गांचे जाळे निर्माण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे 500 कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात येणार आहे.

■ वस्त्रोद्योग :

आरमोरी येथे रेशीम कोष खरेदी-विक्री बाजारपेठ स्थापन करण्यात येणार आहे. हातमाग विणकरांना प्रोत्साहन व सुविधा देण्यासाठी नागपूर येथे 'अर्बन हाट केंद्रा'ची स्थापना करण्यात येणार आहे.

Devendra Fadnavis, Vidarbha
Budget 2025 : अर्थसंकल्प मांडताना दिसला अजित पवार यांच्यातील कवी 

■ नागपूर मेट्रो :

नागपूर मेट्रोचा 40 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यात 6 हजार 708 कोटी रुपये किमतीचे 43.80 किलोमीटर लांबीचे काम प्रगतिपथावर आहे.

■ धार्मिक :

रामटेक येथील श्रीराम मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून येथे दरवर्षी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्याचे नियोजन आहे.

■ पशु पालन :

देशी गायींचे संगोपन, संवर्धन आणि संशोधनासाठी नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथील गौ-विज्ञान अनुसंधान केंद्रास आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे.

■ विमानतळ विकास :

  • याअंतर्गत नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे खासगी सहभागातून श्रेणी वर्धन आणि आधुनिकीकरण होणार आहे.

  • अमरावती येथील बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण झाले असून 31 मार्च 2025 पासून येथे प्रवासी सेवा सुरू होणार आहे.

  • गडचिरोली नवीन विमानतळाच्या सर्वेक्षण व अन्वेषणाची कामे सुरू झाली आहेत. अकोला विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक निधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Devendra Fadnavis, Vidarbha
Padalkar On Budget : गोपीचंद पडळकरांची अर्थसंकल्पावर मजेशीर प्रतिक्रिया, ‘नीट बघायला पाहिजे...त्यांनी काय घोषणा केल्या, हे मी नीट ऐकलंच नाही’

■ सिंचन क्षेत्रासाठी महत्त्वाच्या तरतूदी :

  • गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून डिसेंबर 2024 अखेर 12 हजार 332 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असून हा प्रकल्प जून, 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन राज्य शासनाने केले आहे.

  • वैनगंगा नळगंगा या महत्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पास राज्य शासनाने तत्वतः मान्यता दिली आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 88 हजार 574 कोटी रुपये असून या प्रकल्पाचे लाभक्षेत्र 3 लाख 71 हजार 277 हेक्टर आहे.

  • या प्रकल्पाचा लाभ नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला व बुलडाणा या सहा जिल्ह्यांना होणार आहे.

■ मराठी भाषा संशोधन :

अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठात अभिजात मराठी भाषेच्या संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र तसेच अनुवाद अकादमी स्थापित करण्यात येणार आहे. महानुभव पंथाच्या श्रध्दास्थानांच्या विकासाची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

■ चार नवी न्यायालये :

राज्यात एकूण 18 नवीन न्यायालयांची स्थापना करण्यात येत आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर, वर्धा जिल्ह्यातील आर्वी, नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील न्यायालयांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com