MVA News : 'EVM'मध्ये गडबड?, महाविकास आघाडीच्या २७ उमेदवारांनी ठोठवला न्यायालयाचा दरवाजा!

EVM and Vidhan sabha Election : निवडणूक जाहीर झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत याचिका दाखल करता येते. त्यानुसार ७ जानेवारी ही याचिका दाखल करण्याची शेवटची तारीख होती.
EVM 1
EVM 1Sarkarnama
Published on
Updated on

MVA Candidate on EVM : विधानसभेच्या निवडणुकीत झालेला पराभव अनेकांना अद्याप पचनी पडलेला नाही. अनेकांना ईव्हीएममध्ये काहीतरी गडबड असल्याची शंका आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीच्या एकूण २७ उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.

या सर्वांच्या याचिका दाखल करून घेण्यात आल्या आहेत. यामध्ये माजीमंत्री यशोमती ठाकूर, वसंत पुरके, शरद पवार(Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व माजीमंत्री रमेश बंग, माजीमंत्री राजेंद्र शिंगणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढणारे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल गुडधे, गिरीश पांडव आदींचा समावेश आहे.

EVM 1
PM Modi News : एक नव्हे तीन राज्यांचा स्थापना दिवस आहे एकाच दिवशी; मोदींनी दिल्या खास शुभेच्छा म्हणाले....

निवडणूक जाहीर झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत याचिका दाखल करता येते. त्यानुसार सात जानेवारी ही याचिका दाखल करण्याची शेवटची तारीख होती. याचिक दाखल करणाऱ्यांची एकंदरित संख्या आता २७ झाली आहे. लोकसभेत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. हे बघता विधानसभेच्या निवडणुकीत आघाडीच्या बाजूने निकाल लागले अशी अपेक्षा अनेकांना होती. मात्र निकालानंतर प्रत्यक्षात उलट झाले. अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला.

EVM 1
Delhi Women Voters : ...म्हणून दिल्ली विधानसभेसाठी 'आप', 'भाजप' अन् 'काँग्रेस'साठी महिला मतदार सर्वाधिक महत्त्वाचा घटक!

काँग्रेसचे(Congress) फक्त १६ , शिवसेना (उबाठा) २१, राष्ट्रवादी कॉंग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे १० आमदार निवडून आले आहेत. विदर्भातील अनेक दिग्गज नेते पराभूत झाले. या सर्वांनी ईव्हीएमने निवडणूक घेण्यापूर्वी या कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता निवडणूक आयोगाने केली नाही असा दावा याचिकेच्या माध्यमातून केला आहे. ईव्हीएमने निवडणूक घेण्यासाठी नोटिफिकेशन निवडणूक आयोगाने काढले नाही, निकालानंतर पराभूत उमेदवारांना सीसीटीव्हीचे फुटेज, फॉर्म नंबर १७ दिले जात नाही. व्हीव्हीपॅटची मोजणीसुद्धा केली जात नाही. माहिती अधिकार कायद्यांतंर्गत ही माहिती देणे बंधनकारक असूनही आमचे हक्क डावलल्या जात असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहेत. या सर्व याचिका स्वतंत्रपणे ॲड. आकाश मून, ॲड. ऋग्वेद ढोरे यांच्यामार्फत दाखल करण्यात आल्या आहेत.

दक्षिण-पश्चिम नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार प्रफुल गुडधे, दक्षिण नागपूरचे उमेदवार गिरीश पांडव, अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघातील उमेदवार तसेच माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, सुभाष धोटे, तुमसरचे पवार गटाचे चरण वाघमारे , माजी मंत्री वसंत पुरके, पवार गटाचे सलील देशमुख, रमेशचंद्र बंग, अकोला जिल्ह्यातील आकोट मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार ॲड. महेश गणगणे यांचा याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.

(Edited by - Mayur Ratnaprkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com