Mahavikas Aghadi : 'वज्रमूठ सभे'त तेजस ठाकरे उपस्थित राहणार?

Nagpur Rally : तेजस ठाकरे तरूणांसाठी प्रेरणा, ठाकरे गटाच्या नेत्याचे विधान..
Mahavikas Aghadi : Tejas Thackeray
Mahavikas Aghadi : Tejas Thackeray Sarkarnama

Tejas Thackeray News : छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) 'वज्रमूठ सभा' सभा पार पडली. यांनतर आता नागपूर शहरातही (Nagpur City) महाविकास आघाडीला वज्रमूठ सभा होणार आहे. नागपूरमध्ये दर्शन कॉलनी येथल्या सद्भावनानगरच्या मैदानावर ही सभा आयोजित केली आहे. या सभेसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच काँग्रेस आणि एकूणच महाविकास आघाडीचे मुख्य नेते उपस्थित राहणार आहेत. यामुळे या सभेकडे राज्याचे लागले आहे.

Mahavikas Aghadi : Tejas Thackeray
BS Yediyurappa News : शेट्टार पु्न्हा BJP मध्ये आले तर त्यांचे स्वागतच, पण जनता त्यांना माफ करणार नाही..

मात्र या सभेतली मुख्य गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे (Tajas Thackeray) यांची मंचावर उपस्थित असण्याची शक्यता आहे. याबाबत विधानपरिषेदेतील विरोधीपक्ष नेते व शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी याबाबत भाष्य केले आहे.

महाविकास आघाडीची ही आजची 'वज्रमूठ सभा' नागपूर शहरात होत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिली वज्रमूठ सभा पार पडली. यानंतर ही दुसरी सभा होणार आहे. नागपूरच्या या सभेला विरोध होत होता, यामुळे ही सभा अधिक चर्चेत आली.

Mahavikas Aghadi : Tejas Thackeray
Ajit Pawar On Government : शिंदे-फडणवीस सरकार पडणार नाही : अजितदादांचा मोठा दावा; विधानसभेतील संख्याबळाचेही मांडले गणित

दरम्यान, आता या सभेला परवानगी देण्यात आलेली आहे. काही तासातच या सभेला सुरूवात होणार आहे. सभेपूर्वीच आता अंबादास दानवे तेजस ठाकरे यांच्यासंदर्भात सभेच्या उपस्थितीबाबत शक्यता वर्तवली आहे. दानवे म्हणाले की, “आजच्या सभेला तेजस ठाकरे येण्याची शक्यता आहे. तेजस ठाकरे आजच्या तरूणांसाठी प्रेरणा आहेत, त्यामुळे तरूणांची या सभेला मोठ्या उपस्थिती इच्छा आहे,” असे दानवे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com