Nagpur Politics: ‘धन लावा व निवडणूक जिंका‘; मुंबई पालिकेच्या सर्व्हेवरुन वडेट्टीवारांनी भाजपवर केले गंभीर आरोप

Nagpur Politics: मुंबई महापालिकेत भाजपचे नेमके किती नगरसेवक निवडून येणार? याचा सर्व्हे भाजपनं केला असून ही त्यांची काल्पनिक कथा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
vijay Wadettivar
vijay Wadettivar
Published on
Updated on

Nagpur Politics: मुंबई महापालिकेत भाजपचे शंभर नगरसेवक निवडून येणार असल्याचे सर्वेतून समोर आले आहे. हा सर्वे भाजपनेच केला आणि मीडियापर्यंत पोहचवला, पण ही काल्पनिक कथा आहे. लोकांचे परस्पेशन बदलण्याचा हा केविलावाना प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांचा सर्वे त्यांनाच सर्वांना सांगितला, नगरपालिका आणि नगरपरिषदेत भाजपचे शंबर नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने आश्चर्य व्यक्त करून 'धन लावा आणि निवडणूक जिंका' या भाजपच्या धोरणावरही त्यांनी टीका केली.

vijay Wadettivar
मतदार याद्या 13 प्रकारचे लोक दुरुस्त करु शकतात, BLOs कसं होता येतं?

वडेट्टीवार म्हणाले, भाजपला एवढचा विश्वास आहे तर बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवावी. मात्र, पराभव निश्चित असल्याने ते भाजपला करायचे नाही. जे बिहारमध्ये केले तेच मुंबईत त्यांना करायचे आहे. तसेच त्यांना लोकशाही संपवायचीच आहे. नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे शंभर नगरसेवक बिनविरोध निवडून आहे ते बळाचा वापर करून आणि धमकावून आले आहेत. सत्ता तुमची, यंत्रणा तुमची, खुशाल लोकशाही पायदळी तुडवा असेही वडेट्टीवार संतापाने म्हणाले.

यावरून खरोखर पारदर्शक निवडणूक होईल का असा प्रश्न पडतो. यांच्याकडे धन एवढे आहे की धन लावा आणि निवडणुका जिंका असे यांचे धोरण असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र लढावे अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे. आमची सुद्धा हीच भूमिका आहे. याबाबत आम्ही सकारात्मक आहोत.

vijay Wadettivar
BLOs Deaths: निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेत BLOच्या डोक्यावर नेमकं कशाचं ओझं? गेल्या काही दिवसांत 14 जणांनी संपवलं जीवन; वाचा सविस्तर

सध्या नगरपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कुठल्याच पक्षाने महायुती आणि महाविकास आघाडी केलेली नाही. सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. भाजपलाही ती बंडखोर शमवता आली नाही, असे असताना भाजचे शंभर नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. विजय वडेट्टीवार यांनीसुद्धा यावर आश्चर्य व्यक् केले आहे. यापूर्वी असे कधी घडले नव्हते. भाजपच्या काळात हे कसे काय घडत आहे अशी विचारणा करून वडेट्टवार यांनी यावर शंकाही व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com