CM of Maharashtra : मुख्यमंत्री कोण होणार? नागपूरकरांनी ठरवून टाकलं, पोस्टर्सही झळकली...

Devendra Fadnavis BJP Mahayuti : राज्याचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून राज्यभरात पोस्टर लावले जात आहेत.
Devendra Fadnavis Poster
Devendra Fadnavis PosterSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : महायुतीला बहुमत प्राप्त झाले असतानाही आठ दिवासांपासून राज्यात सत्ता स्थापन झालेली नाही. मुख्यमंत्री कोण होणार, यावर अद्याप संभ्रम आहे. रोज नवी नावे आणि नवे समीकरण समोर येत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मोदी-शाह यांची पसंती असल्याचे सांगण्यात येते. मात्र अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे पाच तारखेपर्यंत सर्वांच्या प्रतीक्षा ताणल्या गेल्या असताना नागपूरमध्ये भले मोठे पोस्टर झळकले आहे.

‘मी पुन्हा येईल'असा उल्लेख असलेले पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कोणाचेही नाव यावर नसले तरी फडणवीस यांची पाठमोरी प्रतिमा आहे. हे बघता देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याचा संदेश पोस्टरच्या माध्यमातून देण्यात आला असल्याचे दिसून येते.

Devendra Fadnavis Poster
Ajit Pawar Politic's : अजितदादांचा ठाकरे, शरद पवारांना दे धक्का...तीन माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर!

रोज घडणाऱ्या राजकीय घडामोडी, भेठीगाठी, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे धक्कातंत्र, अलीकडेच मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यात सत्ता आल्यानंतर भाजपने निवडलेला मुख्यमंत्री बघता फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे दाव्याने कोणी सांगू शकत नाही. भाजपचे नेतेही मुख्यमंत्री कोण होणार, हे सांगताना थबकतात. स्पष्टपणे कोणी कोणाचे नाव घेताना दिसत नाही.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शपथविधीची तारीख जाहीर केली. त्यातही मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेणार आहे, हे त्यांनी सांगितलेले नाही. मध्यंतरी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे बोलले जात होते. ते गावी गेले होते. यादरम्यान त्यांनी मौनव्रत धारण केले होते. ते मुंबईत परतले आहेत. त्यांनी मोदी आणि शाह जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे सांगून आपला मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला असल्याचे दिसून येते.

Devendra Fadnavis Poster
Chandradeep Narake: आमदारकीचा गुलाल लागताच चंद्रदीप नरके ॲक्शन मोडवर; माजी सरपंचाला कोर्टात खेचलं!

आता गृहखात्याची अट शिवसेनेने टाकली असल्याचे समोर आले आहे. हे सर्व दबावाचे राजकारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कसे उलटवून टाकणार, हे येत्या दोन दिवसांत समजले. या सर्व पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात ‘मी पुन्हा येईल' हा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम बनविण्यासाठी, माझ्य बळीराज्याचे हात बळकट करण्यासाठी आणि नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी... मी परत येईल, असा उल्लेख यावर करण्यात आला आहे. भल्यामोठ्या सभेला पाठमोरे संबोधित करणारा फडणवीस यांचा फोटोही यावर आहे. मात्र फलक कोणी लावले, प्रकाशक कोण, याचा उल्लेख यावर करण्यात आलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com