Mahendrasingh Chandel : गोंडपिपरींचा भूमिपूत्र पहिल्यांदाच मैदानात; महेंद्रसिंह चंदेलांचा मोठा निर्णय

Rajura Vidhan Sabha : कुठल्याही स्थितीत पूर्ण ताकतीने निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.
Mahendrasingh Chandel
Mahendrasingh ChandelSarkarnama

Chandrapur Political News : राजुरा विधानसभा मतदारसंघात राजुऱ्याच्या शिलेदांरानीच नेतृत्व केले. याचा थेट परिणाम जिवती, गोंडपिपरी तालुक्याच्या विकासावर झाला. राजुऱ्याच्या नेत्यांनी या मागास तालुक्यांचा केवळ राजकारणासाठी फायदा केला. दोन्ही तालुक्यात रोजगारांच्या संधी निर्माण केल्या नाहीत. शेतकऱ्यांना न्याय दिला नाही. आता नेमका हाच मुद्दा घेत गोंडपिपरीचे भुमीपूत्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेंद्रसिंह चंदेल हे मैदानात उतरले आहेत. कुठल्याही स्थितीत पूर्ण ताकतीने निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.

राजुरा विधानसभा मतदारसंघात राजुरा, कोरपणा, जिवती अन् गोंडपिपरी या तालुक्यांचा समावेश आहे. सध्या काँग्रसचे सुभाष धोटे (Subhash Dhote) हे या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करत आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या क्षेत्रात तीनदा शेतकरी संघटनेला तर एकदा भाजपला आमदारकीची संधी मिळाली आहे. आजपर्यत या मतदारसंघात राजुऱ्यांच्या नेत्यांचाच वरचष्मा राहिला आहे. राज्यात अजित पवार (Ajit Pawar) गटाने भाजपसोबत युती केली आहे. या युतीतून राजुरा विधानसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला यावी, यासाठी नेत्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahendrasingh Chandel
Maratha Arakshan Vishesh Adhiveshan : शिंदे सरकारचा सुपरस्ट्रोक; पण हा प्रश्न अनुत्तरीतच...

महेंद्रसिंह चंदेल (Mahendrasingh Chandel) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी आता कुठल्याही स्थितीत आमदारकी लढण्याचा संकल्प बांधला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चंदेल संपूर्ण राजुरा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. चंदेल यांच्यासह त्यांच्या पत्नी विद्यमान नगरसेवक आहेत. राजुरा विधानसभा क्षेत्रातील युवा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चंदेल हे गावागावात विविध क्रीडा सामन्यांत सक्रिय सहभाग घेत आहेत. त्यांनी शेतकरी बांधवांच्या हिताचाही मुद्दा हाती घेतला आहे.

Mahendrasingh Chandel
Pimpri Chinchwad News : पिंपरी-पालिकेच्या बजेटमध्ये तिन्ही आमदारांना झुकते माप; कुणाच्या पारड्यात किती?

राजुरा विधानसभा मतदारसंघ (Rajura) हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. पण गेल्या काही वर्षांत काँग्रेसचा या गडाला अनेकांनी सुरूंग लावला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत याठिकाणी वंचित आघाडी, गोंडवाना पार्टीचे गोदरू पाटील जुमनाके यांनी लक्षणीय मत घेतली होती. संजय धोटे हे 2014 च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार होते. त्यांनी त्यावेळी विजय मिळविला होता. पण 2019 च्या निवडणुकीत ते चक्क तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. भाजपचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला, हा मुद्दा घेत आता राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवर आपला हक्क सांगितला आहे.

राजुरा विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागाला आमदारकी भोगणारे नेते न्याय देऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्याप्रती विधानसभा मतदारसंघात कमालीचा संताप आहे. आता हाच नारा देत महेंद्रसिंह चंदेल यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राजुरा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांना सोबत घेत त्यांनी आपल्या कामांना सुरुवात केली आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रातील गोंडपिपरी, जिवती या तालुक्यांना अद्यापही नेतृत्वाची संधी मिळाली नाही. अशात चंदेल यांनी आता निवडणुकीसाठी कंबर कसल्याचे चर्चेचा विषय ठरला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Mahendrasingh Chandel
Ganpat Gaikwad : आमदार गणपत गायकवाडांचे केबल कार्यालय फोडले; चार जणांना अटक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com