Ganpat Gaikwad : आमदार गणपत गायकवाडांचे केबल कार्यालय फोडले; चार जणांना अटक

Kalyan Crime News : कोळशेवाडी पोलिसांची कारवाई, दोन आरोपी फरार
Ganpat Gaikwad
Ganpat GaikwadSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Crime News : गोळीबार प्रकरणातील आरोपी भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा भाऊ अभिमन्यू गायकवाड यांच्या तिसाई केबल नेटवर्कच्या ऑफिसची तोडफोड करत कर्मचार्यांना मारहाण करण्यात आली होती. हे कार्यालय आमदार गायकवाड (Ganpat Gaikwad) यांचा भाऊ अभिमन्यू गायकवाड चालवतो. कोळशेवाडी पोलिसांनी तोडफोड व मारहाण करणाऱ्या सहा आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील चार जणांना अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत.

मयूर चव्हाण (रा.मुरबाड) व्यंकटेश कोणार (रा.नांदिवली), करण अर्जय गुप्ता (रा.काटेमानिवली), स्वरुप सोरटे (रा. नांदिवली) यांना अटक केली आहे. तर फरारी दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. तोडफोडीची घटना गाडीला चावी लावण्यावरून घडल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ganpat Gaikwad
Ranajagjitsinha Patil : ओमराजेंविरोधात राणाजगजितसिंह पाटलांचा रोल ठरणार महत्त्वाचा; काय आहे धाराशिवचं गणित ?

कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड यांनी जागेच्या वादातून शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार केला होता. त्यातील जखमी गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आमदार गायकवाड यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली. सध्या आमदार गायकवाडांसह इतर आरोपी तळोजा कारागृहात आहेत. त्यातच आमदार गायकवाडांच्या तिसगाव नाका येथे तिसाई केबलच्या ऑफिसमध्ये तोडफोड व कर्मचाऱ्यांना मारहाणीचा प्रकार घडला.

कल्याण पूर्व (Kalyan) तिसगाव नाक्यावर आमदार गणपत गायकवाड यांचे केबलचे ऑफिस आहे. हे ऑफिस आमदारांचा भाऊ अभिमन्यू गायकवाड चालवतात. तेथे सोमवारी सायंकाळी कार्यालयाबाहेर एक कर्मचाऱ्याची बाईक उभी होती. या बाईकमध्ये एका तरुणाने चावी टाकली. त्यावेळीच कार्यालयातील एक व्यक्ती बाहेर आली. त्याने त्याला काय करतो असे विचारताच दोघांमध्ये वाद झाला. चावी लावणाऱ्या तरुणाने त्याच्या काही साधीदारांना बोलावून घेतले. साथीदार एका कारमधून आले. त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. यापैकी तिघांना कार्यालयातील कर्मचाऱ्याने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Ganpat Gaikwad
Assembly Special Session: मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 'ते' शब्द अन् रोहित पवारांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com