Manoj Jarange vs Obc : मनोज जरांगे की ओबीसी ? काँग्रेसच्या 'या' नेत्यांनी जाहीर केली भूमिका

Congress leaders on OBC reservation News : ओबीसी समाजात समावेश करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला ओबीसी समाजाचा विरोध आहे.
OBC Vs Maratha
OBC Vs MarathaSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष राज्यात निर्माण झाला आहे. ओबीसी समाजात समावेश करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला ओबीसी समाजाचा विरोध आहे. याबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी आपली भूमिका जाहीर करावी, असे आवाहन भाजपच्यावतीने सातत्याने केले जात आहे.

ओबीसीचे आरक्षण कमी करायचे का? अशी विचारणा भाजपचे नेते व राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. काँग्रेसने यावर आपली अधिकृत भूमिका जाहीर केली नाही, असे असले तरी नागपूरच्या संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आंदोलनाला अनेक काँग्रेस आमदार, खासदारांसह अनेक नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे. यावरून भूमिका स्पष्ट झाली आहे.

जरांगे यांच्या मागणीला विरोध दर्शवण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी (OBC) महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. जरांगे यांनी ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी राज्य सरकारने मान्य केल्यास आमरण उपोषण आणि मुंबईत आंदोलन करण्याचा इशाराही महासंघाने दिला आहे. यामुळे महायुती सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. एकीकडे जरांगे तर दुसरीकडे ओबीसी अशी अडचण निर्माण झाली आहे.

OBC Vs Maratha
Nagpur BJP: नगरसेवकांचा 120 चा आकडा कसा गाठणार? नागपुरात भाजपचा कस लागणार

ओबीसी समाजात सुमारे साडेतीनशे जातींचा समावेश आहे. ओबीसीच्या लोकसंख्या लक्षात घेता 27 टक्के आरक्षण अपुरे आहे. यात मराठ्यांचा समावेश केल्यास ओबीसीच्या आरक्षणात आणखी कपात होईल. हा ओबीसीवर अन्यायच असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या अशी महासंघाची मागणी आहे.

OBC Vs Maratha
Manoj Jarange Aggressive : 'आंदोलन मागे घेणार नाही, राज्य अस्थिर करण्याचा फडणवीसांचा डाव', मनोज जरांगे पाटील आझाद मैदानातून कडाडले

जरांगे यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे आमदार व नेते सहभागी झाले आहेत. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आंदोलनाला समर्थन जाहीर केले आहे. काँग्रेसचे (Congress) नेते राहूल गांधी ओबीसी समाजाला बळ देण्‍याची मागणी करीत आहेत तर दुसरीकडे जरांगे यांच्या आंदोलनाला काँग्रेसचे काही नेते समर्थन देत आहेत. यावरून भाजपच्यावतीने काँग्रेसची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

OBC Vs Maratha
Manoj Jarange Protest : "जरांगे हा शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब.."; मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

काँग्रेस ओबीसीच्या की जरांगे यांच्या पाठिशी आहे हे जाहीर करावे, अशी मागणी केली जात आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांनाही भूमिका जाहीर करण्याचे आवाहन केले आहे. यावर काँग्रेसने अद्याप अधिकृतपणे आपली भूमिका जाहीर केली नाही. मात्र विदर्भातील नेत्यांनी ओबीसी महासंघाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचे गडचिरोलीचे खासदार डॉ. नामदेव किरपान यांनी आपण ओबीसीसोबत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या सोबतच काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी, सुधाकर अडबाले, माजी आमदार व काँग्रेसचे पदाधिकारी अशोक धवड यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला आहे.

OBC Vs Maratha
Manoj Jarange Health Update : 'दुसऱ्याच दिवशी आवाज खोल, तोंडाला पानी...', बोलता बोलता मनोज जरांगे पाटीलांनीच दिली प्रकृतीची अपडेट

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com