Maharashtra Home Minister targeted : आंदोलनावर संशय घेतला... थेट गृह खात्याचे मंत्री टार्गेटवर; शिवीगाळ अन् धमक्यांचे प्रकार

Political News : गृहराज्यमंत्र्यांना आई- बहिणीवरून शिवीगाळ करण्यात आली आहे.
Maratha Reservation
Maratha Reservation sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला कोण रसद पुरवत आहे, याची माहिती गृह विभागाला आहे, या सर्वांवर आमची नजर असल्याचे सांगून संबंधितांना इशारा देणाऱ्या गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांना धमक्या देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘आम्ही धाराशिवकर’ या फेसबुक पेजवरुन गृहमंत्र्यांना आई- बहिणीवरून शिवीगाळ करण्यात आली आहे. पंकज भोयर यांनीच ही माहिती माध्यमांना दिली.

पंकज भोयर यांनी सोमवारी नागपूरच्या संविधान चौकात सुरू असलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी त्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले जाणार नाही, असे आश्वासन महासंघाच्या आंदोलकांना दिले. तत्पूर्वी त्यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला रसद पुरवण्यावर आमची नजर असल्याचे सांगितले होते. कदाचित हीच बाब शिवीगाळ करणाऱ्यांना खटकली असावी. भोयर यांना शिवीगाळ करून त्यांनी आपला राग व्यक्त केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Maratha Reservation
Manoj Jarange Patil Agitation: आता मनसे उतरली मैदानात, म्हणाले, शिवरायांची शपथ घेणारे एकनाथ शिंदे गप्प का?, आहेत कुठे!

याबाबत भोयर यांनी पोलिस तक्रार करण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, थेट गृह राज्यमंत्र्यांना धमक्या देण्यात आल्या असल्याने आता पोलिस काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण द्यावे, यासाठी मनोज जरांगे मुंबईत आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनात हजारो मराठा बांधव सहभागी झाले आहेत. काही आंदोलक हुल्लडबाजी करीत असल्याच्या तक्रारी आहेत. एका महिला पत्रकाराशी असभ्य वर्तन केल्याचाही प्रकार समोर आला आहे.

Maratha Reservation
Manoj Jarange Patil Agitation: आता मनसे उतरली मैदानात, म्हणाले, शिवरायांची शपथ घेणारे एकनाथ शिंदे गप्प का?, आहेत कुठे!

मनोज जरांगे यांनी सुद्धा याची दखल घेतली आहे. त्यांना आंदोलकांना मराठा समाजाची बदनामी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पाच दिवसांपासून मुंबईत दाखल झालेले आंदोलक रेल्वे स्थानकावर आंघोळी करतात, रस्ते अडवून कुस्ती व क्रिकेट खेळून कोंडी करीत असल्याच्या तक्रारी आहेत.

Maratha Reservation
Manoj Jarange Patil : कोर्ट म्हटले मराठा आंदोलकांना मुंबईबाहेर रोखा, जरांगेंनी आज सांगितला 'गनिमी कावा'

न्यायालयाने जरांगे यांना फक्त एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी दिली होती. जरांगे यांनी आझाद मैदान सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे दोन वेळा आतापर्यंत त्यांच्या आंदोलनाला मुदतवाढ देण्यात आली होती. आता मात्र न्यायालयाने त्यांना आता मैदान सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Maratha Reservation
Maratha Reservation : मोठी बातमी! हैद्राबाद गॅझेट लागू होणार, मनोज जरांगेंची मागणी तत्त्वत: मान्य?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com