Maratha Reservation : "गप्प का? मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करा.."; जरांगेंच्या आंदोलनात अखेर भाजपने शरद पवारांना ओढलंच

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकले आहेत. कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देऊन मराठ्यांना आरक्षण देण्याची त्यांनी मागणी केली आहे. विरोधकांनी त्यांच्या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे.
Sharad Pawar, Manoj Jarange Patil
Maratha reservation protest in Mumbai where Manoj Jarange Patil led a massive rally demanding OBC quota. Political leaders extended their support.Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 29 Aug : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकले आहेत. कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देऊन मराठ्यांना आरक्षण देण्याची त्यांनी मागणी केली आहे. विरोधकांनी त्यांच्या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक आमदार व खासदार आंदोलनात सहभागी झाले आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी याबाबत अद्याप काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

ते इतर सर्वच विषयांवर बोलतात मात्र जरांगे पाटलांच्या आंदोलनावर का बोलत नाहीत? असा सवाल राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायचे का? यावर शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी.

तुमचे यावर काय म्हणणे आहे हे महाराष्ट्राला कळू द्या, असं म्हणत बावनकुळेंनी पवारांनी या विषयावर बोलावं असं आवाहन केलं आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांनीही या विषयावर आपली भूमिका जाहीर करावी असंही बावनकुळे म्हणाले.

Sharad Pawar, Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : "तुम्ही जाम केलेली मुंबई दोन तासात मोकळी झाली पाहिजे..."; आझाद मैदानात पाय ठेवताच जरागेंचं मराठ्यांना आवाहन

जरांगे यांना फक्त एक दिवस मुंबईत आंदोलन करण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. त्यांनी ही मुदत वाढवून देण्याची मागणी केली. यावर बावनकुळे म्हणाले, मुदतवाढ देण्याचा निर्णय न्यायालयाला घ्यायचा आहे. त्यावर मी बोलणे योग्य नाही.

मात्र सरकार म्हणून आमची भूमिका सहकार्याची आहे. मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना दुखावले नाही. जे नियमात बसते त्यानुसार ते निर्णय घेतात. महायुती सरकारनेच मराठा समाजाला न्याय दिला असल्याचा दावाही बावनुकळेंनी यावेळी केला. ओबीसी बाहेर असलेल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांना आरक्षण दिल्या जात आहे.

Sharad Pawar, Manoj Jarange Patil
Mohan Bhagwat : देश चालवण्यात भाजप संघापेक्षा तज्ज्ञ; मतभेदाचे काही विचार असतात पण..., मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. यात आणखी काय देता येईल याचा प्रयत्न सुरू आहे. सारथीच्या माध्यमातून मराठा समाजाला फायदा होत आहे. काँग्रेसने ओबीसीला कधीही न्याय दिला नाही. ओबीसी आयोग, ओबीसी मंत्रालय भाजप सरकारने आणले. यात आज 353 जातींचा ओबीसीत समावेश आहे.

यात मराठ्यांचा समावेश केल्यास ओबीसीच्या आरक्षणात आणखीच कपात होती. हे योग्य आहे, असे करायचे का यावर काँग्रेसने स्पष्ट भूमिका जाहीर करावी. ओबीसी किंवा अन्य समाजाचे आरक्षण काढून मराठ्यांना देणे योग्य नाही. ही भाजप सरकारची भूमिका आहे. ओबीसी पिढीजात प्रमाणपत्र दिल जात आहे. अजून सर्वेक्षण सुरू आहे पण सरसकट प्रमाणपत्र देता येणार नाही. ज्यांची ओबीसीमध्ये नोंद आहे त्यांनाच प्रमाणपत्र आणि आरक्षण दिले जाते असंही बावनकुळेंनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com