Maratha Vs OBC Community : राज्यभर मराठ्यांचा एल्गार, चंद्रपूर - गडचिरोलीत ओबीसींचा हुंकार !

Chandrapur : या आंदोलनाला संपूर्ण विदर्भातील ओबीसींनी मोठा पाठिंबा दिला.
Maratha Vs OBC Community
Maratha Vs OBC CommunityGoogle
Published on: 
Updated on: 

Chandrapur - Gadchiroli OBC-Maratha Political News : राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलनाची धग पेटली आहे. मनोज जरांगे यांनी मराठ्यांना आरक्षण देत कुणबी समाजाचे प्रमाणपत्र द्यावे, यासाठी पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक होत असताना चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यात मात्र मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, अशी ठाम भूमिका घेतली आहे. (OBCs from all over Vidarbha gave great support to this movement)

ओबीसी बांधवांमध्ये जनजागृती करण्यासाठी उद्या, एक नोव्हेंबरपासून भेटीगाठी उपक्रमाला सुरुवात होणार आहे. मनोज जरांगे यांनी पहिल्यांदा आरक्षणाचं हत्यार उपसलं अन् त्यानंतर चंद्रपूरातून ओबीसींनी आपला आवाज बुलंद केला. रवींद्र टोंगे तब्बल २२ दिवस अन्नत्याग आंदोलनाला बसले होते. त्यांच्या या आंदोलनाला संपूर्ण विदर्भातील ओबीसींनी मोठा पाठिंबा दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा

मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, स्वाधार योजनेची अंमलबजावणी करावी व ओबीसींसाठी असलेली ७२ वसतिगृह सुरू करावी, या मागण्या ओबीसी महासंघाने केल्या आहेत. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागण्या मान्य करत असल्याचे सांगत स्वतः चंद्रपुरात येऊन रवींद्र टोंगेंचे उपोषण सोडविले होते.

दरम्यान, आता पुन्हा एकदा मराठ्यांना कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यांच्या आंदोलनानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. अनेक नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. आंदोलनाची वाढती धग पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन दिले आहे. अशा स्थितीत चंद्रपूर गडचिरोलीत मात्र मराठ्यांचा ओबीसीत समावेश करू नये, अशी भूमिका ओबीसी महासंघाने घेतली आहे.

विविध बैठका विचारमंथन करणे सुरू झाले आहे. मराठ्यांना आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, पण त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, अशी आमची आधीपासूनच भूमिका असल्याचे ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, ओबीसी समाजात जनजागृती करण्यासाठी आता एक नोव्हेंबरपासून आंदोलनकर्ते रवींद्र टोंगे यांच्या वेंडली गावापासून अभियानाला सुरुवात करण्यात येत आहे.

महासंघाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. एकीकडे राज्यात पुन्हा एकदा मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावत असताना समाजात आक्रमकता दिसून येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. काही नेत्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. एकीकडे आरक्षणाच्या भूमिकेवर मराठा समाजाने एल्गार पुकारला असताना दुसरीकडे चंद्रपुरात मात्र ओबीसी समाज आता एकसंघ होऊन हुंकार पुकारण्याच्या तयारीत आहे. यासाठी बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.

Edited By : Atul Mehere

Maratha Vs OBC Community
Chandrapur Bank : कोर्टाच्या आदेशाने सर्वांचा जीव वरतीखालती, मेसेजने सांगितले पुढे ढकला भरती

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.