BJP Politics: बावनकुळेंनी विरोधकांना पुन्हा डिवचलं; म्हणाले, 'ज्या आमच्याकडे नव्हत्या, त्यासुद्धा पालिका भाजप जिंकणार...'

BJP Vs Congress : काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी निकालाची वाट बघण्यापेक्षा भाजपने गुलाल उधळून टाकावा अशी चिडून प्रतिक्रिया पूर्वीच दिली आहे.
BJP stronghold in Kamthi, highlighting Chandrashekhar Bawankule’s political dominance
BJP stronghold in Kamthi, highlighting Chandrashekhar Bawankule’s political dominanceSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका आटोपल्या आहेत. उद्या रविवारी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीमध्ये भाजपला अभूतपूर्व यश मिळणार आहे. ज्या महापालिकेच्या विरोधकांच्या ताब्यात होत्या सुद्धा यावेळी भाजप आणि महायुती जिंकणार असल्याचा दावा भाजपचे नेते व राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजप महायुती 51 टक्के मते घेऊन जिंकणार असल्याचा बावनकुळे यांच्या दाव्यावरून आधीच विरोधक चिडले आहेत.

निवडणूक आयोगाला मॅनेज केले, मतदार याद्यांचा घोळ, दुबार मतदार आणि पैशाच्या जोरावर भाजप जिंकणार असल्याचा आरोप विरोधकांचा आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी निकालाची वाट बघण्यापेक्षा भाजपने गुलाल उधळून टाकावा अशी चिडून प्रतिक्रिया पूर्वीच दिली आहे.

आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्या भाजपकडे नव्हत्या, त्यासुद्धा नगर पालिका आम्ही जिंकणार असल्याचे सांगून विरोधकांना आणखीच डिवचले आहे. बावनकुळे म्हणाले, प्रचारा दरम्यानच जनतेचा कौल भाजप व महायुतीकडे दिसून आला. त्यामुळे विरोधकांच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकासुद्धा महायुती जिंकणार आहे. नगरपालिकेत मोठा विजय आम्हाला मिळणार आहे. भाजपचे दावे आणि विरोधकांचे आरोप बघता काँग्रेसची (Congress) आधीच हार मानली असल्याचे दिसून येते.

BJP stronghold in Kamthi, highlighting Chandrashekhar Bawankule’s political dominance
Beed Election: बीडमध्ये राष्ट्रवादी-भाजपातील चिखलफेकीत आमदार क्षीरसागर शांतपणे खेळत राहिले; कोणाचं 'पार्सल' पॅक होणार?

नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने महायुती टाळली होती. स्थानिक निवडणूक कार्यकर्त्यांची असते. सर्वांना संधी मिळावी आणि बंडखोरी टळावी यासाठी वेगवेगळे लढणे योग्य असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र यामुळे आणखीचच गोंधळ उडाला होता. बंडखोर टळण्याऐवजी त्यात वाढ झाली, युतीने एकमेकांचे उमेदवार पळवले, यावरून मोठे मतभेद उफाळून आले होते.

हे बघता आता महापालिकेची निवडणूक युती एकत्रित लढणार असल्याचे दिसून येते. भाजप आणि शिवसेनेत प्रामुख्याने युती होणार असल्याचे संकेत वाटाघाटी, बैठकींवरून दिसून येत आहे. नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीची पहिली फेरी २ डिसेंबरला घेण्यात आली. उर्वरित नगरपालिकेसाठी शनिवारी मतदान घेण्यात आले. उद्या रविवारी (ता. २१) निवडणूक झालेल्या पालिका आणि परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.

BJP stronghold in Kamthi, highlighting Chandrashekhar Bawankule’s political dominance
Shivsena UBT News : उद्धव ठाकरेंचा पक्ष छत्रपती संभाजीनगरमध्ये खरंच 'शिल्लक सेना' ठरणार? माजी महापौर, नगरसेवक पदाधिकाऱ्यांचं इनकमिंग सुरूच!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com