MLA Sanjay Gaikwad News : वाघाचा दात गळ्यात आल्यानंतर आमदार गायकवाड अडकले जमीन प्रकरणात; गुन्हा दाखल!

Vidarbha Political News : महिलेला जीवे मारण्याची आमदार संजय गायकवाडांनी धमकी दिली?
MLA Sanjay Gaikwad News
MLA Sanjay Gaikwad NewsSarkarnama
Published on
Updated on

Buldhana News : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. शिवजयंतीच्या दिवशी त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या बाईटमध्ये मोठ्या जोशात केलेल्या वक्तव्याचा फास आता त्यांच्याभोवती आवळला होताच. आता त्यांच्यावर एका महिलेची जमीन बळकल्याचा आरोप आहे. (Vidarbha Political News)

MLA Sanjay Gaikwad News
PM Modi Yavatmal Visit : भावना गवळी म्हणाल्या माझं तिकीट फायनल, तर संजय राठोड म्हणतात...

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर जमीन बळकल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. आमदार गायकवाड यांच्यासोबत त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड, सोमनाथ चौबे, दिपाली चौबे आणि ज्ञानेश्वर वाघ या चौघांवरही गुन्हा दाखल झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोताळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने (Court) गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. कलम 156 ( 3 ) नुसार 143, 150, 379, 385, 447 आणि 34 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आमदार गायकवाड यांनी शेतजमीन बळकवल्याचा आरोप एका महिलेने केला होता. तर त्या शेतावर आमदार गायकवाड यांनी फार्म हाऊस बांधल्याचा देखील आरोप आहे.

MLA Sanjay Gaikwad News
Solapur NCP : सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा बडा नेता अजितदादांची साथ सोडणार

राजूर (Rajur) येथील दीड एकर शेतजमीन बळकावली असा आरोप आमदार गायकवाड यांच्यावर आहे. तसेच या संबंधित महिलेला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिल्याचा आरोप आहे. पोलिसांकडून योग्य कारवाई करत नसल्याने उच्च न्यायायात हे प्रकरण गेले होते. नागपूर स्थित एका महिलेची शेतजमीन बळकावण्याचा आरोप आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com