Winter Session : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन आजही; खोक्यांचा नारा आजही घुमला !

Winter Session : “महाराष्ट्राला धोका, मंत्र्यांना खोका”, “खाऊन खाऊन ५० खोके, माजलेत बोके”, अशा घोषणांनी विरोधकांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला.
Winter Session protest
Winter Session protest Sarkarnama

Winter Session : “महाराष्ट्राला धोका, मंत्र्यांना खोका”, “खाऊन खाऊन ५० खोके, माजलेत बोके”, “विदर्भ हैराण, सत्ताधारी खातो गायरान”, “शेतकरी हैराण, सत्तार खातो गायरान”, “कुणी उद्योग घ्या, तुम्ही खोके घ्या”, अशा घोषणा देत आजही महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  

आमदारांनी हातात मांजरीचे खेळणे आणि रिकामे खोके हातात घेऊन सरकारचा निषेध केला. आज हिवाळी अधिवेशनाचा नववा दिवस असून गायरान जमीन आणि उद्योगमंत्र्यांनी केलेल्या अजब उद्योगाच्या विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार निदर्शने केली. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी ईडी सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला.

Winter Session protest
Winter Session 2022 : 52 हजार कोटींच्या कामांची घोषणा ; विदर्भाला काय दिलं ?

विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील कामकाज सुरु झालं आहे. आजही विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. "हकालपट्टी करा, हकालपट्टी करा.. भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करा", "शेतकऱ्यांना धोका, मंत्र्यांना खोका", "विदर्भाला धोका, मंत्र्यांना खोका", "महाराष्ट्राला धोका... मंत्र्यांना खोका", "शेतकरी हैराण, सरकार खातो गायरान", "सीमावासी हैराण.. सरकार खातो गायरान" अशा घोषणांनी विरोधकांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला. 

Winter Session protest
BMC NEWS : कार्यालय कुणाचे?; ठाकरे-शिंदे गटातील वाद चिघळला..

“महाराष्ट्रासाठी खोके नवीन नाही. गाव, वाडे, तांडे इथपर्यंत खोके पोहोचले आहेत. बैलपोळ्यामध्ये बैलांच्या झोळीवर देखील खोके होते. सभागृहातील या बोक्यांनी खोके खाल्ले आणि माजले देखील. हे आम्ही खोके आणि बोके घेऊन प्रतिकात्मक आंदोलन केले,” असल्याचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve), नाना पटोले (Nana Patole), रोहित पवार (Rohit Pawar), यशोमती ठाकूर (Yashomati Thakur), धनंजय मुंडे (Dhananjay Munde), जितेंद्र आव्हाड भास्कर जाधव, सचिन अहीर, विकास ठाकरे यांच्यासह सर्व विरोधी पक्षाचे आमदार सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com