Amol Kolhe Vs Praful Patel : खासदार अमोल कोल्हे करणार प्रफुल पटेलांचा हिशेब चुकता!

Shiv Swarajya Yatra : आता गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये वावरत असलेले गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे शिलेदार माझ्या विरोधात प्रचारासाठी आले होते. त्यामुळे काही फरक पडला नाही. मात्र मी गद्दारांचा हिशेब बरोबर करणार आहे.
Amol Kolhe-Praful Patel
Amol Kolhe-Praful PatelSarkarnama
Published on
Updated on

Bhandara, 10 September : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शिव स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ केला आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे झालेल्या यात्रेच्या कार्यक्रमातून खासदार अमोल कोल्हे यांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनाच आव्हान दिले.

‘तुम्ही माझा पराभव करण्यासाठी शिरूर मतदारसंघात आले होते, आता मी विधानसभेच्या निवडणुकीत भंडारा-गोंदियात येऊन तुमचा हिशेब चुकता करणार आहे,’ असे चॅलेंज खासदार कोल्हे यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल (Praful Patel) यांना दिले आहे. दरम्यान, आता पटेल हे अमोल कोल्हे यांना काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

खासदार अमोल कोल्हे आपल्या भाषणात म्हणाले, आता गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये वावरत असलेले गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे शिलेदार माझ्या विरोधात प्रचारासाठी आले होते. त्यामुळे काही फरक पडला नाही. मात्र मी गद्दारांचा हिशेब बरोबर करणार आहे. नव्याने इतिहास घडविण्याची जबाबदारी आपण सर्वांना घ्यायची आहे.

Amol Kolhe-Praful Patel
Bhagirath Bhalke : भगीरथ भालकेंनीही विधान सभेसाठी शड्डू ठोकलाच; जन आशीर्वाद यात्रेतून ताकद आजमावणार

लोकसभेच्या २००९ च्या निवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदारसंघात पराभव झाल्यानंतरही शरद पवार यांनी आपल्या मुलीला मंत्री केले नाही. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील तुमच्या नेत्याला राज्यसभेवर पाठवले आणि केंद्रात मंत्रीही केले.

साहेबांच्या मनात आले असते तर ते आपल्या मुलीलाही मंत्री करू शकले असते. मात्र, ईडी, सीडीच्या भीतीमुळे या बड्या नेत्याने संघर्षाच्या काळात साहेबांचे बोट सोडले आणि गद्दारी केली. अशा गद्दारांना आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवायची आहे.

महाविकास आघाडीचे सरकार आणायचे असे महाराष्ट्रानेच ठरवले आहे. तुतारी वाजवून हा विजयाचा नाद आपल्याला करायचा आहे. महाराष्ट्रातले महायुतीचे सरकार घालविण्यासाठी तुम्हा सर्वांचा आशीर्वाद हवा आहे. गद्दारांना धडा शिकवा आणि पुन्हा एकदा २०१९ निवडणुकीच्या इतिहासाची पुनरावृती करण्याचे आवाहन या वेळी अमोल कोल्हे यांनी केले.

Amol Kolhe-Praful Patel
Sharad Pawar Politics : पंढरपूर विधानसभेसाठी इच्छूक तीन नेत्यांनी एकत्रित घेतली पवारांची भेट; मोहिते पाटील ॲक्शन मोडवर

खासदार अमोल कोल्हे यांनी पटेल यांच्या होम ग्राउंडवर जाऊन दिलेल्या आव्हानावर पटेलांकडून काय उत्तर येते, हे पाहावे लागेल. ते उत्तर देता की नाही, हा महत्वाचा विषय आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी खासदार मधुकर कुकडे आदी उपस्थित होते.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com