

नागपूर काँग्रेसमध्ये फूट पडली असून धानोरकर आणि वडेट्टीवार असे दोन गट स्थापन झाले आहेत. पण यातील ज्या गटाला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पाठिंबा दिला असेल तो गट अधिकृत समजला जाणार आहे. पण यामुळं काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
खासदार प्रतिभा धानोरक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा जो गट स्थापन केला जात आहे तो प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने स्थापन करण्यात आला असल्याचा दावा धानोरकर गटाकडून करण्यात आला आहे. त्यानुसार, धानोरकर गटाचा गटनेताही निवडला गेला आहे. धानोरकर गटामध्ये 13 नगरसेवकांचा समावेश आहे. तसंच दुसरीकडं विजय वडेट्टीवार यांचाही एक गट विभागीय आयुक्त कार्यालयाकडं निघाला आहे. तसंच ज्यांची संख्या जास्त त्यांचा गटनेता होईल, असा दावा वडेट्टीवार गटानं केला आहे.
दरम्यान, वडेट्टीवार गटाचे प्रवीण पडवेकर म्हणाले, "आज जे घडत आहे ते पहिल्यांदाच घडत आहे. प्रदेशाध्यक्ष काल येऊन गेले, त्यांच्यासमोर ठरलं की सर्वांनी मिळून गट स्थापन करायचा पण काही लोक ऐकत नाहीत. त्यांची भाजपसोबत कुठेतरी साटंलोट आहे. गटनेत्याचा विषय प्रदेशाध्यक्षांनी थेट सांगितलेला आहे की, दोघांनी बसून करावं यासाठी दोन नाव दिले होते. यापैकी एक वसंता देशमुख आणि दुसरं अडबाले यांचं नाव होतं. त्यामधून एक करा म्हणून प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं होतं. पण प्रदेशाध्यक्षांनी दिलेला आदेशा धुडकावून इथे येऊन गट स्थापन करण्यात येत आहेत. दुसरा गट दहा-बारा लोकांचा आहे तर आमच्याकडं १५ नगरसेवक आहेत. प्रदेशाध्यक्षांचा आदेशच पाळत नसतील तर कोण कार्यकर्ता काम करणार? पहिल्यांदा अशी घटना घडत आहे की काँग्रेसचे शहराध्यक्ष येतात, आमदार, खासदार येतात आणि त्यानतंरही वेगळा गट निर्माण तयार केला जात आहे हे काँग्रेससाठी योग्य नाही"
तर दुसरीकडं खासदार प्रतिभा धानोरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, प्रांताध्यक्षांनी सांगितल्यानुसार गटनेता हा प्रदेशाध्यक्ष देणार आहेत. महापौर हा माझा होणार आणि स्टॅंडिंग कमिटीचे चेअरमन हे वडेट्टीवार यांचे होतील. प्रांताध्यक्षांनी सांगितलं होतं की गटनेता हा धानोरकर किंवा वडेट्टीवार यांचाही नाही राहणार, प्रांताध्यक्ष यांचा राहील. प्रांताध्यक्षाच्या गटनेत्याचे नाव आम्ही दिलेले आहे, कोणी कोणाचंही असलं तरी हे सर्व पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. रीतसर सर्व प्रक्रिया पूर्ण करून आम्ही गट तयार केला आहे. पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले सर्व आमचे आहेत, त्यामुळं काँग्रेसपक्षाचा अधिकृत गट तयार झाला आहे. प्रांताध्यक्षांनी दोघांचाही कॉम्बिनेशन व्हावं यासाठी आमदार अडबाले सर यांची नियुक्ती केली होती. त्यामुळं हे सगळे एक वाजेपासून बसून होते. प्रांताध्यक्षांनी त्याचं नाव फायनल केलं होतं. जे आमच्यावर आरोप करत आहेत ते जबाबदार नेते नाहीत. स्वतः विजय वडेट्टीवार बोलले असते तर मी मान्य केलं असतं, पण बोलणारी व्यक्ती ही जबाबदार नसल्याने कोण काय आरोप करतंय हे मी गृहीत धरत नाही.
सुरेंद्र अडबाले हे आमचे गटनेते आहेत. झालेला गट हा पक्षाचा आहे आणि निवडून आलेले लोक देखील पक्षाचे आहेत, मला बदनाम करा याला बदनाम करा हा विषय नाही. आम्ही जी काही प्रक्रिया केली ती नियमानुसार 27 लोकांची प्रक्रिया केली आहे. यामध्ये कुणालाही झुकतं माप दिलेलं नाही. निवडून आलेले सर्व पक्षाचे आहेत आणि कोर्टात कोणीही गेलं तरी आम्ही सर्व प्रक्रियेनुसार केलेलं आहे. आम्ही रीतसर गट स्थापन केला आहे समोरचा गट कोर्टात जात असेल तर त्याला आम्ही उत्तर देऊ. आमच्या गटनेत्याचं नाव प्रांताध्यक्षांनी सुचवलेलं आहे. मी आता कुठलंही पत्र दाखवणार नाही मी नियमानुसार सर्व कार्यवाही केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.