

Raj Thackeray: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती असून १०० वा जन्मदिवस आहे. यानिमित्त मुंबईत आयोजित एका अभिवादनपर कार्यक्रमात महापालिका निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र आले होते. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी बाळासाहेबांबाबतच्या अनेक आठवणी सांगितल्या. तसंच बाळासाहेब नेमके कसे होते हे कोणाला कळलेच नाहीत, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. पण आजच्या राजकारणावर भाष्य करताना आज बाळासाहेब इथं नाहीत तेच बरं आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.
राज ठाकरे म्हणाले, "मी त्यादिवशी माझ्या भाषणात म्हटलं होतं की, आज बाळासाहेब इथं असायला पाहिजे होते. पण "आज महाराष्ट्राची आणि देशाची जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे गुलामांचा बाजार! महाराष्ट्रातील हे चित्र पाहिल्यानंतर आज मला असं वाटतंय बाळासाहेब नाहीएत ते बरंय. तो माणूस किती व्यथित झाला असता त्याला काय त्रास झाला असता. पूर्वी दोनएकशे वर्षांपूर्वी जशी माणसं चावडीवर उभी असायची आणि माणसांचे लिलाव सुरु असायचे, आज तसे महाराष्ट्रात लिलाव चालू आहेत"
आज अनेक ठिकाणी कल्याण-डोंबिवलीसह बाहेर इतर ठिकाणची परिस्थिती पाहून शिसारी आली. आपण कुठे चाललो आहोत असं वाटतं? आणि आज ही परिस्थिती पाहायला बाळासाहेब ठाकरे नाहीत यासारखी चांगली गोष्ट नाही. हे सर्व बघायला तो माणूस आज नाहीए, तो माणूस हे पाहूच शकला नसता. कारण आज जे काही शुन्यातून उभं केलं, पण बाहेरच्या पक्षातील लोक पाहा अनेक असे लोक आहेत जे बाळासाहेबांनीच निर्माण केले होते. पण ज्या गोष्टी घडत जात आहेत किंवा घडत गेल्या ते पाहून वाईट वाटतं. मी ही जेव्हा बाहेर पडलो तेव्हा माझ्या वेदाना वेगळ्या होत्या. माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं तर घर सोडणं होतं. पण त्या सर्व गोष्टींना आता वीस वर्षांचा काळ निघून गेला आहे. अनेक गोष्टी मला उमजल्या आणि मला वाटतं उद्धवलाही उमजल्या असतील, पण द्या सोडून त्या आता. कशाला आयुष्यभर कुंथत बसायचं आहे.
पण मला असं वाटतं की, बाळासाहेब ठाकरे या विषयावर एकदा व्याख्यानच द्यायला आवडेल. त्या माणसाचे सगळे पैलू मला तुमच्यासमोर एकदा मांडायचेत. बाळासाहेब ठाकरे हा माणूस कसा होता हे जगाला कळलंच नाही. आम्ही घरातले असून आम्हाला नाही कळला तो माणूस तर तुम्हाला कुठून कळणार. पण जे होतं ते विलक्षण होतं, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या व्यक्तीमत्वाबाबत भाष्य केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.