Nagpur Graduate Election: नागपूर पदवीधरमध्ये काँग्रेसला धक्का बसणार? अभिजीत वंजारींची धडधड वाढवणारा अंदाज समोर

BJP Vs Congress: नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस तसेच महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार व उमेदवार अभिजीत वंजारी यांच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले आहेत.
Abhijeet Vanjari Sudhakar Kohale
Abhijeet Vanjari Sudhakar Kohale Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Nagpur News: नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजप-काँग्रेस आणि अपक्ष यामध्ये तिरंगी लढत होत आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी(ता.23 ऑक्टोबर)मतदान पार पडलं आहे. या मतदानप्रक्रियेनंतर आता विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे 'साम'च्या'एक्झिट पोल'चे अंदाज समोर येत आहे. या एक्झिट पोलच्या अंदाजात नागपूर पदवीधरमध्ये भाजप कमबॅक करण्याची शक्यता असून काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारींची धडधड वाढवणारा अंदाज समोर येत आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस तसेच महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार व उमेदवार अभिजीत वंजारी यांच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले आहेत. मात्र, भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचं नाव नागपूर पदवीधरमधून संभाव्य आमदार म्हणून 'साम'च्या एक्झिट पोलच्या आकडेवारीत पुढे आले आहे. जर एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला तर काँग्रेससाठी हा मोठा धक्का असणार आहे.

नागपूर पदवीधरमध्ये भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारींमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. विशेष म्हणजे काँग्रेसकडून नागपूर मतदारसंघाच्या मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. मात्र, आता नागपूर पदवीधरचा मतदारसंघ भाजप पुन्हा एकदा आपल्याकडे खेचून आणण्याची शक्यता राजकीय जाणकर व्यक्त करताना दिसून येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं होमग्राऊंड असलेल्या नागपूरमध्ये गेल्या पदवीधरच्या निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे या निवडणुकीतील विजयासाठी स्वत: फडणवीसांसह महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी कंबर कसली होती. जोरदार प्रचार,पक्षसंघटना,बंडखोरी रोखण्यात आलेलं यश यामुळे नागपूरमध्ये भाजपचं पारडं जड असल्याचं राजकीय जाणकरांनी व्यक्त केलं आहे.

Abhijeet Vanjari Sudhakar Kohale
Congress Politics: मोदींचं कौतुक,भाजप प्रवेशाची ऑफर, 'RSS'च्या पुस्तकाचं वाचन...; काँग्रेसच्या बड्या नेत्यानं दिवाळीपूर्वीच फोडले फटाके

तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारींनीही आपला राजकीय अनुभव या निवडणुकीतील विजयासाठी पणाला लावल्याचं दिसून आलं होतं. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांनीही वंजारींसाठी प्रचार केला होता. पण महाविकास आघाडी किंवा काँग्रेस नेत्यांच्या प्रचारात तो उत्साह कमी होता. नागपूर पदवीधरमध्ये झालेली नितेश कराळे यांच्या बंडखोरीचा वंजारींना फटका बसण्याची शक्यता असल्याचं मत राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

काँग्रेसच्या अभिजीत वंजारींना नागपूर पदवीधरसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीत नाराजीचा भडका उडाला होता. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नितेश कराळेंनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर दुसरीकडे भाजपमधूनही बंडखोरीचं निशाण फडकवण्यात आलं होतं.

Abhijeet Vanjari Sudhakar Kohale
Eknath Shinde News: एकनाथ शिंदेंचा संताप; ठाणे महापालिकेचे 3 अधिकारी तडकाफडकी निलंबित, 2 अधिकार्‍यांवर कारवाईची टांगती तलवार

मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे भाजपच्या बंडखोर उमेदवारांनी माघार घेतली होती. त्यामुळे भाजपच्या पदवीधर मतदारसंघाच्या मतदान फुटण्याचा संभाव्य धोका टळला. त्यामुळे भाजपचं पारडं या निवडणुकीत जड मानलं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com