Nagpur Liquor Factory: नागपूरच्या नशेत अख्खा देश होणार धुंद! सुरु होणार आशिया खंडातील सर्वात मोठी दारुची फॅक्टरी

Nagpur Liquor Factory: भाजपच्या कार्यकाळात उभारल्या जाणाऱ्या या मद्यनिर्मिती प्रकल्प उभा होत असल्याने विरोधकांना ट्रोल करण्याची आयतीच संधी मिळणार असल्याचे दिसून येते.
Liquor file photo
Liquor file photo
Published on
Updated on

नागपूर जिल्ह्यात वाढलेल्या एमडी तस्करीच्या विरोधात भाजपचे नेते सातत्याने विधानसभेत आवाज उठवत आहेत. विदर्भाला उडता पंजाब होऊ देऊ नका अशी मागणी केली जात असताना आशिय खंडातील सर्वात मोठी दारूचे उत्पादन करणारी फॅक्टरी बुटीबोरी औद्योगिक परिसरात आता बाळसे धरत आहे. भाजपच्या कार्यकाळात उभारल्या जाणाऱ्या या मद्यनिर्मिती प्रकल्प उभा होत असल्याने विरोधकांना ट्रोल करण्याची आयतीच संधी मिळणार असल्याचे दिसून येते.

Liquor file photo
Minimum Balance: ग्राहकांच्या खात्यात किती शिल्लक असावी हे ठरवण्याची बँकाना मुभा - RBI

राज्य सरकार आणि उद्योजकांमध्ये दरवर्षी कोट्यवधींचे करार होत असतात. मात्र, बहुतांश करार शेवटपर्यंत कागदावर राहतात. नागपूरच्या औद्योगिक परिसरात मोजकेचे उद्योग सुरू झाले असल्याने हे अधोरेखित होते. यापूर्वी नागपूर व विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी ‘ॲडव्हांटेज विदर्भ'च्या माध्यमातून कोट्यवधींचे करार झाले आहेत. केंद्रात भाजपची दहा वर्ष आणि राज्यात महायुतीची सत्ता असतानाही विदर्भातील उद्योगांमध्ये फारशी भर पडल्याचे दिसून येत नाही. आता मात्र तब्बल अठराशे कोटी रुपयांची गुंतणूक असलेल्या मद्यनिर्मितीच्या प्रकल्प लवकरच उभारला जाणार आहे. मद्य निर्मिती क्षेत्रातील आघाडीची फ्रेंच कंपनी पर्नोड रिकार्ड इंडिया ही नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात आशिया खंडातील सर्वात मोठा माल्ट स्पिरिट डिस्टिलरी व मॅच्युरेशन प्लांट उभारणार आहे.

Liquor file photo
Nashik Shiv sena: शिवसेनेच्या नाशिकमधील बैठकीत राडा, राष्ट्रवादीचा पदाधिकारी ठरला कारणीभूत; नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत नागपूरमध्येच २४ डिसेंबर २०२४ मध्ये या प्रकल्पाचा एमओयू झाला होता. या प्रकल्पासाठी पर्यावरण विभाग, राज्य उत्पादन शुक्ल विभागत तसेच इतर संबंधित यंत्रणांकडून परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नागपूरमध्ये हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यानंतर दररोज ६० हजार लिटर माल्ट स्पिरिटची निर्मिती होणार आहे. यातून वर्षाला १३ लाख दशलक्ष लिटर उत्पादन क्षमतेचा टप्पा गाठला जाईल. प्रकल्पासाठी कच्चा माल म्हणून दरवर्षी ५० हजार टन बार्ली (जव) स्थानिक शेतकऱ्यांकडून खरेदी केली जाणार आहे.

Liquor file photo
Sunny Leone on Trump: "आता तर बोलायलाच नको"; ट्रम्प यांच्याबाबत सनी लिओनीनं केला धक्कादायक दावा

विशेष म्हणजे बुटीबोरीपासून वर्धा जिल्हा अवघ्या चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. महात्मा गांधी यांच्या सानिध्यामुळे या संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी आहे. भाजपच्या कार्यकाळात मंत्री असताना सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली होती. त्यानंतर अवैध दारू तस्करीचे प्रमाण चांगलेच वाढले होते. बंदीचे दुष्परिणाम दिसून लागले होते. अडीच वर्षांच्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळात काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सातत्याने पाठपुरावा करून चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटवली. याकरिता त्यांनी समाजसेवक अभय बंग यांचा विरोध झुगारून लावला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com