Minimum Balance: ग्राहकांच्या खात्यात किती शिल्लक असावी हे ठरवण्याची बँकाना मुभा - RBI

नुकतेच ICICI बँकेनं बचत खात्यात किमान शिल्लक ५० हजार रुपये ठेवण्याचा निर्णय घेतला तसंच बॅलन्स कमी झाल्यास ६ टक्के दंड आकारण्याचा निर्णय घेतला होता, यावर आता रिझर्व्ह बँकेकडून हे स्पष्टीकरण आलं आहे.
RBI
RBISarkarnama
Published on
Updated on

Governor speaks on Minimum Balance: बँकेच्या ग्राहकांच्या बचत खात्यात किती किमान शिल्लक रक्कम असावी अर्थात किती मिनिमम बॅलन्स असावा? हे बँका ठरवू शकतात, असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केलं आहे. नुकतेच ICICI बँकेनं बचत खात्यात किमान शिल्लक ५० हजार रुपये ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर रिझर्व्ह बँकेकडून हे स्पष्टीकरण आलं आहे. टाइम्स नाऊनं याबाबत वृत्त दिलं आहे.

RBI
Nashik Shiv sena: शिवसेनेच्या नाशिकमधील बैठकीत राडा, राष्ट्रवादीचा पदाधिकारी ठरला कारणीभूत; नेमकं काय घडलं?

गव्हर्नर नेमकं काय म्हणालेत?

दोन दिवसांपूर्वी ICICI या खासगी बँकेनं आपल्या नव्या ग्राहकांना बचत खात्यावर किमान ५०,००० रुपये शिल्लक रक्कम ठेवण्याचा आदेश काढला. १ ऑगस्ट २०२५ पासून हा आदेश लागूही करण्यात आला. पण इतकी मोठी रक्कम शिल्लक म्हणून ठेवण्यावरुन आणि ती कमी झाल्यास ६ टक्के दंड आकारण्याला बँकेच्या ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला आहे. तसंच या प्रकाराची सोशल मीडियात आणि लोकांमध्येही मोठी चर्चा सुरु आहे.

या चर्चांच्या पार्श्वभूमीवर केवळ ICICI बँकेलाच नव्हे तर इतर सर्वच सार्वजनिक आणि खासगी बँकांना अनुकूल अशी भूमिका भारतातील सर्व बँकांच्या कारभारांचं नियमन करणारी शिखर बँक अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी मांडली आहे.

RBI
Sunny Leone on Trump: "आता तर बोलायलाच नको"; ट्रम्प यांच्याबाबत सनी लिओनीनं केला धक्कादायक दावा

सोमवारी गुजरातमधील एका आर्थविषयक कार्यक्रमात बोलताना गव्हर्नर म्हणाले, बँकांना बचत खात्यांवर ग्राहकांनी कमीत कमी किती शिल्लक रक्कम ठेवावी हे ठरवण्याचा संपूर्ण अधिकार आहे. हा वाद रिझर्व्ह बँकेच्या नियमनाच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. रिझर्व्ह बँकेनं याबाबत सर्व बँकांना मुभा दिली आहे. त्यानुसार काही बँका किमान शिल्लक १०,००० रुपये तर काही बँका २,००० रुपये आणि इतर काही बँका इतर काही रक्कम ठेवतात.

RBI
Vijay Wadettivar: वडेट्टीवारांनी काढले काँग्रेसच्याच नेत्यांचे वाभाडे! भाजपच्या नेत्यांकडून शिकण्याचा दिला सल्ला

सार्वजनिक बँकांनी रद्द केला दंड

पण गव्हर्नर यांच्या याविधानाचा आणि काही सार्वजनिक बँकांनी प्रत्यक्षात घेतलेल्या निर्णयाच्या हे विपरित आहे. कारण स्टेट बँकेनं पहिल्यांदा किमान शिल्लक रक्कम नसेल तर त्यावर दंड आकारण बंद केलं आहे. गेल्या तीन महिन्यात स्टेट बँकेच्या पावलावर पाऊल टाकत पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक आणि इंडियन बँक या सार्वजनिक बँकांनी देखील स्टेट बँकेचाच नियम आपल्याकडंही लागू केला आहे.

RBI
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : आम्ही लोकांच्या मनाची चोरी करतो, उद्धवजी तर जनादेशचोर आहेत! फडणवीसांचा ठाकरेंना टोला..

खासगी बँका आकारतात दंड

दरम्यान, काही खासगी बँका मात्र आपल्या ग्राहकांना बचत खात्यावर किमान शिल्लक ठेवण्याची अट घालतात. जर यापेक्षा शिल्लक कमी झाली तर त्यावर ६ टक्के दंड किंवा ५०० रुपये जो कमी असेल तो दंड आकारतात. काही बँकांनी बचत खात्यांवरचा खर्च वाचवण्यासाठी बचत खात्यावरील व्याजदरही कमी केले आहेत. याचा ग्राहकांना फटका बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com