BJP-Congress Alliance : गडकरी, फडणवीसांच्या नागपुरात काँग्रेस-भाजप युतीचा दणदणीत विजय; अजितदादांच्या राष्ट्रवादीला धक्का

BJP and Congress Alliance Secures Victory : काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील केदार आणि भाजपचे माजी आमदार टेकचंद सावकर यांच्या पॅनेलचे सर्व 13 उमेदवार निवडून आले आहेत. एक उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आला होता.
BJP vs Congress
BJP vs CongressSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : एकमेकांचे कट्टर विरोधक असताना भाजप आणि काँग्रेसने नागपूर जिल्ह्यातील मौदा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत युती केल्याने सर्वांचे निकालाकडे लक्ष लागले होते. या युतीमुळे अपेक्षित असाच निकाल लागला. काँग्रेस-भाजप युतीचे पॅनेल निवडून आले तर एकाकी पडलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रसचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर याच्या पॅनेलचा पराभव झाला.

काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील केदार आणि भाजपचे माजी आमदार टेकचंद सावकर यांच्या पॅनेलचे सर्व 13 उमेदवार निवडून आले आहेत. एक उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी भाजपने आम्हाला धोका दिल्याचा आरोप करून याची तक्रार अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले.

जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपपासून सावध राहावे लागणार असल्याचेही गुजर म्हणाले. राज्यात महायुतीची सत्ता असल्याने आम्ही खरेदी विक्री संघाची निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत चर्चा केली होती.

BJP vs Congress
Cyber theft case : बायको सरपंच, वडील तालुका उपाध्यक्ष... राष्ट्रवादीचा कार्यकर्ता निघाला सराईत सायबर चोरटा

युती कायम ठेवून निवडणूक लढवावी, अशी इच्छा बावनकुळे यांनी व्यक्त केली होती. मात्र त्यांनी या निवडणुकीच्या संदर्भात निर्णय घेण्याचे सर्व अधिकार माजी आमदार टेकचंद सावरकर यांना दिले होते. सुरुवातीला ते सुद्धा सोबत होते. मात्र दोन उमेदवार घेऊन त्यांनी केदारांच्या खेम्यात प्रवेश केला. आपले सर्व उमेदवार आरामात निवडून यावे, यासाठी त्यांनी सोयीचा निर्णय घेतला.

नागपूर जिल्ह्यात सुनील केदार आणि भाजपचे कट्टर वैर आहे. लोकसभेच्या निवडणुकीत केदारांनी भाजपला उघड चॅलेंज केले होते. त्यांनी काँग्रेसचा खासदार निवडूनसुद्धा आणाला. त्यामुळे आपसातील वैर अधिकच वाढले होते. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत मात्र भाजपने केदारांना मोठा पराभवाचा धक्का दिला. त्यांच्यसह केदारांच्या सर्व समर्थकांना पराभूत करण्यात भाजपला यश आले आहे.

BJP vs Congress
'सरपंच' असावा तर असा! प्रत्येकाच्या तोंडी एकच नाव...

आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे त्यांचे नागपूर ग्रामीणमधील वर्चस्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू असताना भाजपच्याच एका नेत्याने त्यांच्यासोबत युती केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन भाजपचे आमदार टेकचंद सावकर यांनी केदारांच्या विरोधात अनेक तक्रारी केल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com