Nagpur Shivsena News: नागपूर महापालिकेच्या उमेदवारीवरुन वाद पेटला; जिल्हाप्रमुखाकडून शहरप्रमुखाचा गेम, आता उद्धव ठाकरेच लक्ष घालणार

Uddhav Thackeray Shivsena : उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसची आघाडी झाली होती. जागा वाटपाचेही ठरले होते. कोणाला कुठल्या प्रभागातून उमेदवारी देण्यात येईल याचाही निर्णय झाला होता. मात्र, शेवटच्या क्षणी आघाडी तुटली.
Shivsena UBT News
Shivsena UBT News Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: नागपूर महापालिकेच्या उमेदवारी व जागा वाटपावरून युती आणि आघाडीमध्ये भांडणे सुरू असतानाच आता उद्धव ठाकरे सेनेत वाद उफाळून आला आहे. जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया आणि शहरप्रमुख नितीन तिवारी यांच्यातील हा वाद आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापर्यंत पोहचला आहे.

एकाच प्रभागातील एकाच जागेवर दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आपला अर्ज बाद व्हावा आणि भाजपचा उमेदवार निवडून यावा यासाठी जिल्हा प्रमुखाने दोन वेगवेगळ्या जागेवर अर्ज दाखल केल्याची तक्रार शहर प्रमुख तिवारी यांनी केली आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसची आघाडी झाली होती. जागा वाटपाचेही ठरले होते. कोणाला कुठल्या प्रभागातून उमेदवारी देण्यात येईल याचाही निर्णय झाला होता. मात्र शेवटच्या क्षणी आघाडी तुटली. त्यामुळे शिवसेनेने (Shivsena) स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. प्रभाग क्रमांक 28 रमणा मारोती परिसर हा शिवसेनेचा गड मानला जातो. जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया येथून चारवेळा निवडून आले आहे.

झलके यांनी मागच्या निवडणुकीत सुमारे १५ मतांनी निवडून आले होते. हे बघता पराभवाच्या भीतीने कुमेरिया यांनी ओबीसी प्रवर्गासोबतच खुल्या प्रवर्गातूनही उमेदवारी दाखल केली. खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढल्यास त्यांची थेट लढत झलके यांच्याशी होणार नाही. कुमेरिया यांनी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अर्ज भरला.

Shivsena UBT News
PMC Election : पुण्यात मुरलीअण्णांच्या एकाही जवळच्या कार्यकर्त्याला तिकीट नाही, एका उमेदवाराचा भरलेला अर्जही काढून घेतला : इतर मातब्बरांनाही घराणेशाहीच्या नियमाचा फटका

दुसरीकडे नागपूरचे संपर्क प्रमुख सतीश हरडे यांनी तिवारी यांना एबी फॉर्म देण्यासाठी दुपारी दोन वाजेपर्यंत ताटकळत ठेवले. त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. नियमानुसार ज्याने आधी अर्ज सादर केला तो स्वीकारला जातो. त्यामुळे नितीन तिवारी निवडणुकीतून बाद होणार आहे.

याचदरम्यान, ओबीसी प्रवर्गातून लढणाऱ्या भाजपच्या पिंटू झलके यांनाही याचा लाभ होणार आहे. हे सर्व षडयंत्र कुमेरिया आणि हरडे यांनी रचले होते असा आरोप तिवारी यांनी केला आहे. याची तक्रार तिवारी यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असून न्याय देण्याची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com