Nagpur Politics : नागपूर महापालिका निवडणुकीचे सर्वाधिक टेन्शन ठाकरेंच्या शिवसेनेला

Nagpur Municipal Election : महापालिका निवडणूक चार महिन्यांच्या आत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने 40 जागांवर तर शिंदेंच्या शिवसेनेने नागपूर शहरात 20 जागांवर दावा केला आहे.
Shivsena UBT
Shivsena UBTSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 10 May : महापालिका निवडणूक चार महिन्यांच्या आत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने 40 जागांवर तर शिंदेंच्या शिवसेनेने नागपूर शहरात 20 जागांवर दावा केला आहे.

सर्वच पक्ष आपापल्या ताकदीनुसार महापालिका निवडणुकीची तयारी करीत असताना सर्वाधिक टेन्शन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आले आहे. शिवसेनेचे दोन तुकडे झाले आहेत. अर्धे शिवसैनिक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर अर्धे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत.

सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडे दोनच नगरसेवक आहेत. आजवर भाजपसोबत युती असल्याने शिवसेनेचे नगरसेवक सुमारे पंचेवीस वर्षांपासून नागपूर महापालिकेत प्रतिनिधित्व करीत आहेत. नैसर्गिक मित्र म्हणून भाजपनेही ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत ठेवले होते.

Shivsena UBT
Supriya Sule : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंचे मोठे विधान, म्हणाल्या, ‘मी एकटी...’

भाजपच्या नेटवर्कचा फायदाही महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला होत होता. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीत सहभागी झाली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने ठाकरेंच्या शिवसेनेचा दक्षिण नागपूर विधानसभा मतदरासंघही हिरावून घेतला होता.

त्यामुळे शिवसैनिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. नागपूरचे दोन जिल्हाध्यक्ष प्रमोद मानमोडे आणि किशोर कुमेरिया या दोघांनाही दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. कुमेरिया यापूर्वी भाजप-सेना युतीचे उमेदवार होते. प्रमोद मानमोडे यांनी दक्षिण नागपूरमधून अपक्ष लढले होते.

मानमोडे शेवटपर्यंत आशेवर होते. शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांना शब्द दिला होता. मात्र काँग्रेसने ताणून धरले. काँग्रेसचे गिरीश पांडव अवघ्या पाच हजार मतांनी पराभूत झाले होते. त्यामुळे काँग्रेस या मदतरसंघावरचा दावा सोडला नाही. शेवटी ठाकरेंच्या शिवसेनेला माघार घ्यावी लागली.

Shivsena UBT
Dada Bhuse Politics: Shocking... मालेगावात थेट मंत्री दादा भुसेंना आव्हान; मंत्री भुसेंच्या मुलाच्या फोटोवर हत्यार ठेवत ठार मारण्याची धमकी!

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रचारात कुठेच दिसले नाहीत. जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया चार वेळा महापालिकेच्या निवडणुकीत जिंकून आले आहेत. ते उपमहापौरसुद्धा होते. त्यांच्या विजयात भाजपचाही वाटा होता. यावेळी उद्धव सेनेला भाजपची साथ मिळणार नाही. दुसरीकडे शिवसेने विरुद्ध काँग्रेसच असाच सामना महापालिकेच्या निवडणुकीत आजवर झाला आहे. त्यामुळे एकट्या पडलेल्या उद्धव सेनेचे टेन्शन चांगलेच वाढले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com