Municipal Corporation Election : खिळखिळ्या झालेल्या आघाडीला सरकारचा ‘हा’ निर्णय अडचणीत आणणार? भाजप आग्रही

BJP strategy for Nagpur elections Maharashtra CM election updates Four-member wards proposal : नागपूर महापालिकेची 2017 च्या निवडणुकीत भाजपने चार सदस्यांच्या प्रभागाचा प्रयोग केला होता. तो कमालीचा यशस्वी ठरला.
Devendra Fadnavis, Nagpur Election
Devendra Fadnavis, Nagpur ElectionSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Politics : महापालिकेची निवडणूक येत्या दोन ते तीन महिन्यांत जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे पुन्हा प्रभाग पद्धतीवर चर्चा सुरू झाली आहे. चार सदस्यांच्या प्रभागाने भाजपला महापालिकेच्या निवडणुकीत चांगलाच फायदा झाला आहे. त्यामुळे चारचा प्रभाग कायम ठेवावा, असा आग्रह भाजप कार्यकर्त्यांचा आहे. हा निर्णय राज्य शासनाने कायम ठेवल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह छोट्या पक्षांची अडचण होणार आहे.

नागपूर महापालिकेची 2017 च्या निवडणुकीत भाजपने चार सदस्यांच्या प्रभागाचा प्रयोग केला होता. तो कमालीचा यशस्वी ठरला. 150 पैकी भाजपचे तब्बल 108 नगरसेवक निवडून आले होते. नागपूर शहरात भाजपचे चार आमदार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. याशिवाय नितीन गडकरी केंद्रीयमंत्री आहेत.

Devendra Fadnavis, Nagpur Election
Devendra Bhuyar : लाडके भाऊ बेरोजगार होणार? माजी आमदार भुयारांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना साकडे

भाजपचे शहरभर कार्यकर्त्यांचे नेटवर्क आहे. भाजप आणि संघाच्या अनेक संघटना कार्यरत आहेत. त्यामुळे चार सदस्यांची प्रभाग पद्धती कायम ठेवावी अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांची आहे. याच निवडणुकीत काँग्रेस फक्त २९ तर राष्ट्रवादीचा एक आणि शिवसेनेचे दोन नगरसेवक निवडून आले होते.

महाविकास आघाडीचे सरकार असताना प्रभाग पद्धतीवर बरीच चर्चा झाली होती. विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. पूर्व प्रमाणे एक सदस्यांना प्रभाग करावा अशी मागणी त्यावेळी नागपूरच्या स्थानिक नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांकडे केली होती. मात्र यास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध केला होता. एक सदस्यांच्या प्रभाग पद्धतीचे धोकेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे आघाडीनेही चार सदस्यांचा प्रभाग कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

Devendra Fadnavis, Nagpur Election
Mahayuti Government : ''रिझर्व्ह बँकेच्या राज्य वित्त जोखीम विश्लेषण अहवालात महाराष्ट्राची आर्थिक कामगिरी उत्कृष्ट''

ओबीसी आरक्षण व संभाव्य वाढीव कोकसंख्येचा विचार करून आघाडीने दोन प्रभाग वाढवण्याचा निर्णय घेतला होता. यावर भाजपच्या नेत्यांनी आक्षेप घेतला. ओबीसी आरक्षणाचा विषय न्यायालयात गेला. त्यामुळे आघाडीच्या कार्यकाळात महापालिकेची निवडणूक होऊ शकली नाही. तेव्हापासून महापालिकेवर प्रशासक नेमण्यात आले आहे. ही निवडणूक 2021 मध्ये होणे अपेक्षित होते. आता मार्च-एप्रिल महिन्यात ती होईल असे दावे केले जात आहे.

सध्या शहरात काँग्रेस खिळखिळी झाली आहे. गटबाजी संपलेली नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दोन तुकडे झाले आहेत. अशा परिस्थिती महाविकास आघाडी कायम राहिली नाही तर सर्वच पक्षांना महापालिकेच्या निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उद्धव ठाकरे सेनेने आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर करून टाकले आहे. आघाडीतील भांडणाचा फायदा घेण्यासाठी चारचा प्रभाग कायम ठेवावा याकरिता भाजप नेत्यांमार्फत जोर लावला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com