Nagpur Municipal Election : बावनकुळेंवर मतचोरी अन् पैसे वाटपाचे आरोप करणं भोवलं : मित्रपक्षाच्या 2 उमेदवारांना भाजपने घरी बसवलं

Bawankule vs Kumbhare Clash : कामठी नगरपालिकेच्या निवडणुकीत कुंभारे आणि बावनकुळे यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. कुंभारे यांनी मतचोरी करून बावनकुळे निवडून आल्याचा आरोप केला. नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने पैसे वाटले, नगराध्यक्षपदाचे उमेदवार यांच्या नातेवाइकाच्या फार्महाऊवरून पैसे वाटप केल्याचा दावाही कुंभारे यांनी केला होता.
Chandrashekhar Bawankule, Sulekha Kumbhare
Chandrashekhar Bawankule, Sulekha Kumbharesarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 31 Dec : नगरपालिकेच्या निवडणुकीत जागा वाटपावरून नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि बहुजन रिपब्लकन एकता मंचच्या नेत्या माजी मंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांच्यात टोकाची भांडणे झाली होती. याचा मोठा धक्का कुंभारे यांना बसला आहे. त्यांच्या पक्षाच्या दोन्ही नगरसेवकांचे भाजपने तिकिट कापले आहे.

मागील नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत कुंभारे यांचा बहुजन रिपब्लिकन एकता मंचने भाजपसोबत युती केली होती. त्यांना दोन जागा भाजपने दिल्या होत्या. मात्र उमेदवारांच्या हाती कमळ देण्यात आले होते. नागेश सहारे आणि वंदना भगत हे दोन्ही उमेदवार निवडून आले होते. वंदन भगत यांनी यांनी पुन्हा त्याच प्रभागातून तिकीट मागितले होते.

मात्र भाजपने ते नाकारले. नागशे सहारे यांची जागा महिलेसाठी आरक्षित झाली. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा प्रभाग क्रमांक ३१ मध्ये वळवला होता. नगरसेवक असताना ते क्रीडा समितीचे सभापती होते. मात्र त्यांची जागा भाजपने शिवसेनेसाठी सोडली. या जागेवर मात्र भाजपने त्यांचेच कार्यकर्ते गणेश चर्लेवार यांना शिवसेनेच्या कोट्यातून तिकिट दिले आहे.

Chandrashekhar Bawankule, Sulekha Kumbhare
Municipal Elections : 'नागपूर महापालिकेची सर्वांत खराब कामगिरी...' ऐन निवडणुकीच्या काळात समोर आलेल्या 'त्या' प्रतिज्ञापत्रामुळे CM फडणवीसांचं टेन्शन वाढलं

कामठी नगरपालिकेच्या निवडणुकीत कुंभारे आणि बावनकुळे यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. कुंभारे यांनी मतचोरी करून बावनकुळे निवडून आल्याचा आरोप केला. नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने पैसे वाटले, नगराध्यक्षपदाचे उमेदवार यांच्या नातेवाइकाच्या फार्महाऊवरून पैसे वाटप केल्याचा दावाही कुंभारे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. त्यावरून दोन्ही नेत्यांमधील संबंध चांगलेच ताणल्या गेले.

Chandrashekhar Bawankule, Sulekha Kumbhare
Nagpur NCP : अजितदादांची राष्ट्रवादी झाली 10 नगरसेवकांची, दोन सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात

बावनकुळे यांचे कामठी विधानसभा मतदारसंघाचे दार आपण बंद करण्याचा इशाराहीसुद्धा त्यांनी दिला आहे. सातत्याने माध्यमांमध्ये बदनामी करीत असल्याने बावनकुळे यांनी त्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. याशिवाय पाच कोटी रुपयांचा मानहानीचा दावा त्यांच्यावर ठोकला आहे. दोघांमधील वाद बघता नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत आता कुंभारे यांच्या पक्षासाठी जागा सोडण्यात येणार नाही असे समजते.

बहुजन रिपब्लिकन एकत मंचच्या माजी नगरसेविका वंदना भगत यांनी आपण भाजपकडून लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नागेश सहारे म्हणाले, मी कुंभारे यांच्यासोबत होतो. मात्र महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच भाजपात प्रवेश केला होता. फक्त माझी जागा त्यांच्या कोट्यात दाखवण्यात आली होती. बहुजन रिपब्लिकन एकता मंचसोबत आपला काही आता संबंध नसल्याचे सहारे यांनी स्पष्ट होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com