Vijay Wadettiwar : 'नाना पटोले हटाव' मोहिमेवर विजय वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले...

Congress Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यामुळे आता प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नवा प्रदेशाध्यक्ष कोण यावर चर्चा सुरू झाली आहे. काही नेत्यांनी नाना पटोलेंच्या विरोधात मोहीम उघडली आहे. संभाव्य प्रदेशाध्यक्ष म्हणून माजी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांचेही नाव आघाडीवर आहे.
Vijay Wadettiwar, Nana Patole
Vijay Wadettiwar, Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 29 Nov : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) दारुण पराभव झाल्यामुळे आता प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नवा प्रदेशाध्यक्ष कोण यावर चर्चा सुरू झाली आहे. काही नेत्यांनी नाना पटोलेंच्या विरोधात मोहीम उघडली आहे.

संभाव्य प्रदेशाध्यक्ष म्हणून माजी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar) यांचेही नाव आघाडीवर आहे. असे असले तरी पटोले यांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेत आपण नसल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे. निवडणुका म्हटल्या की जय पराजय होतच असतो. काही चुकाही होतात.

मात्र याकरिता व्यक्तिशः मोहीम राबवण्याची आवश्यकता नाही. आपण मोहिमेचा भागीदार नाही. राजकारणात संयम महत्त्वाचा असतो. भविष्यात 16 चे 160 आमदार कसे होतील हे उद्धिष्ट ठेवून काम करण्याची गरज असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होणार असेल तर आनंदच असल्याचं म्हटलं.

फडणवीस विदर्भाचे आहेत. विदर्भाचा बॅकलॉक त्यांनी भरून काढावा. विदर्भाच लेकरू म्हणून विविध क्षेत्रातील विदर्भाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आमची त्यांच्याकडून आहे. मध्यंतरी ते सुडाचे राजकारण करतात असा ठपका त्यांच्यावर होता. तो ते पुसून काढतील. आमचे आणि त्यांचे वैयक्तिक वैर नाही. विचारधारेची लढाई आहे.

Vijay Wadettiwar, Nana Patole
Election Commission : मतांची टक्केवारी कशी वाढली, EVM मध्ये घोळ? विरोधकांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण

फडणवीस परिपक्व नेते असल्याने त्यांनाही याची जाणीव असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मोदी व फडणवीस यांच्या आशीर्वादावरच अवलंबून राहावे लागणार आहे. काही दिले नाही तर चुपचाप राहावे लागेल. पक्ष सांभाळण्यासाठी शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागणार आहे. त्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे नाही.

Vijay Wadettiwar, Nana Patole
Maharashtra Poliitics : "विदर्भाचं लेकरू..." CM पदासाठी फडणवीसांच्या नावाची चर्चा सुरू होताच काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून शुभेच्छांचा वर्षाव

बंटी शेळके काय बोलला हे माहीत नाही. त्याचा उद्वेग कशामुळे झाला याची कारणे शोधली पाहिजे. निवडणुकीत जय पराजय होत असतो. उमेदवारांना तिकीट वाटप राहूल गांधी आणि हायकामांडने केले. राज्याच्या नेतृत्वाला शिफारस करण्याचा अधिकार असतो. बंटी शेळके हा लढवय्या आहे. निवडणुकीत मदत कमी पडल्याने त्यांने राग व्यक्त केला असावा. आपण हायकमांडच्या कानावर हा सर्व प्रकार टाकू असेही वडेट्टीवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com