MNS News : मनसेला युवा कार्यकर्त्यांकडून चमत्काराची आशा

Nagpur MNS News : राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षकांना पाठवले आहे. सोबतच त्यांना सक्षम उमेदवार शोधण्यासही सांगण्यात आले आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 31 July : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) स्थापनेपासून विधानसभेच्या निवडणुकीत विदर्भात अद्याप एकाही उमेदवाराला 50 हजार मतांचा आकडा गाठता आला नाही. हा इतिहास असल्याने मनसेच्या निरीक्षकांची सक्षम उमेदवार शोधण्यासाठी चांगलीच दमछाक सुरू आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षकांना पाठवले आहे. सोबतच त्यांना सक्षम उमेदवार शोधण्यासही सांगण्यात आले आहे. नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यात मनसेचे निरीक्षक दाखल झाले आहेत.

दोन दिवसांपासून शहर आणि ग्रामीण पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. नागपूरमध्ये (Nagpur) ग्रामीण पदाधिकाऱ्यांसोबत निरीक्षकांनी चर्चा केली. येथील राजकीय परिस्थिती जाणून घेतली. उद्या गुरुवारी (1 ऑगस्ट) शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.

तत्पूर्वी, विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक 40 हजार मते बुलढाण्याचे उमेदवार गायकवाड यांनी घेतली होती. त्या खालोखाल मागील विधानसभेच्या निवडणुकीत वरोरा-भद्रावतीचे उमेदवार रमेश राजूरकर यांनी 36 हजार 751 मते घेतली होती. मनसेचे (MNS) विदर्भातील एकमेव नेते राजू उंबरकर हे वणी विधानसभा मतदारसंघातून मागील निवडणूक लढले होते.

Raj Thackeray
Video Uddhav Thackeray : 'एक तर तुम्ही राहाल नाही तर मी', उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा

त्यांच्यासाठी राज ठाकरे यांनी सभा घेतली होती. उंबरकर यांना 14 हजार मते मिळाली होती. त्यांच्या शेजारच्या मतदारसंघात मनसेचे रमेश राजूरकर हे लढले होते. 2014 च्या निवडणुकीत नागपूर जिल्ह्याचे प्रमुख किशोर सरायकर यांनी हिंगणा मतदारसंघातून निवडणूक लढली होती. त्यावेळी भाजपचे समीर मेघे आणि राष्ट्रवादीच्यावतीने माजी मंत्री रमेश बंग इथून लढले होते.

सरायकर यांना फक्त 1027 मते मिळाली. त्यांचे डिपॉजिटसुद्धा जप्त झाले होते. याचवेळी नागपूरचे उपशहर प्रमुख प्रशांत पवार यांनी पश्चिम नागपूर विधानसभेची निवडणूक लढली होती. त्यांच्या मतदारसंघातील झिंगाबाई टाकळी या वस्तीत राज ठाकरे यांनी सभा घेतली होती. सुमारे 15 हजार लोकांनी सभेला गर्दी केली होती.

Raj Thackeray
Amol Mitkari Vs MNS : विचारांची लढाई दगड-धोंड्यांवर आली, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती लयाला गेली

मात्र, प्रशांत पवार यांना 2300 मते मिळाली होती. त्यानंतर पवार आणि सरायकर यांनी निवडणूक लढण्याचे धाडसच केले नाही. पक्षाचा घसरत चाललेला ग्राफ आणि अंतर्गत असंतोष बघून मनसेने विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील कार्यकारिणी बरखास्त केली होती. नवे पदाधिकारी नियुक्त करताना युवकांना अधिकाधिक संधी दिली होती. आता मनसे युवा कार्यकर्त्यांकडून चमत्काराची अपेक्षा करीत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com