Nagpur Political News : जिल्ह्यातील बड्या नेत्यांमुळे खोपडे, मेघे पुन्हा उपेक्षितच राहणार?

Impact of senior leaders on Khopde and Meghe's political standing: भाजपचे पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार कृष्णा खोपडे यांनी विजयाचा चौकार मारला आहे.
Nagpur News
Nagpur News Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या दोन दिग्गज नेत्यांमुळे झाकोळल्या गेलेले नागपूर जिल्ह्यातील दोन आमदारांना आतातरी मंत्रिमंडळात स्थान मिळणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

भाजपचे पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार कृष्णा खोपडे यांनी विजयाचा चौकार मारला आहे. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक सव्वा लाखांच्या विक्रमी मतांनी ते निवडून आले आहेत.

ही कामगिरी भाजपच्या एकाही नेत्याला करता आली नाही. नगरसेवक असताना खोपडे यांनी तत्कालीन काँग्रेसचे बडे प्रस्थ असलेले माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना पराभवाचा धक्का दिला होता. त्यानंतर चतुर्वेदी यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली. त्यापूर्वी पूर्व नागपूर चतुर्वेदी यांचा बालेकिल्ला अशीच ओळख होती. मात्र खोपडे यांनी आता कमळाचे इमले बांधले आहेत. मात्र पंधरा वर्षांत त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही.

Nagpur News
Top 10 Candidates Highest Vote Margin : सर्वाधिक मताधिक्य मिळालेल्या टॉप 10 उमेदवारांमध्ये 6 भाजपचे; अव्वल कोण?

देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री होती. नागपूर जिल्ह्यातून चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) ऊर्जामंत्री होते. त्यामुळे खोपडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नाही. महायुतीचे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडाळाच्या विस्तारात कार्यकाळ संपला. दुसरीकडे हिंगणा विधानसभा मतदारसंघातून समीर मेघे यांनी विजयाची हॅटट्रिक नोंदवली आहे. त्यांचेही नाव महायुतीची सत्ता असताना संभाव्य मंत्री म्हणून समोर येत होते. मात्र शेवटपर्यंत त्यांना संधी मिळाली नाही.

Nagpur News
Rahul Kul : अनोखी हॅटट्रिक; मंत्रीपदाचा वनवास संपणार?

आता तिसऱ्यांदा निवडून येऊन त्यांनी मंत्रिमंडळावर आपला दावा आणखी मजबूत केला आहे. ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे ते चिरंजीव आहेत. दत्ता मघे अनेक वर्षे शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात होते. फडणवीस आणि बावनकुळे यांचे मंत्रिमंडळातील स्थान पक्के मानले जाते. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातून ल्हातून मंत्रिमंडळात समावेश करताना मर्यादा येणार आहेत. याचा फटका खोपडे आणि मेघे यांना यावेळीसुद्धा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागपूर जिल्ह्यात दोन बड्या नेत्यांमुळे दोन्ही आमदारांची उपेक्षा होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com