Maharashtra Politics : काँग्रेस-जनसंघाला आव्हान देणारा रिपाई आज महापालिकेत शून्य! २५ वर्षांत एकही नगरसेवक नाही!

Nagpur municipal election : कधी काळी काँग्रेस आणि जनसंघाला तोड निर्माण करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचे आता वैभवशाली दिवस नसून उतरती कळी लागली आहे.
Republican Party Politics
Republican Party Politicssarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. सहा दशकांपूर्वी नागपुरात रिपब्लिकन पक्ष एक प्रभावी राजकीय शक्ती म्हणून उदयास आला होता.

  2. काळानुसार गटबाजी वाढत गेली आणि कार्यकर्त्यांची ताकद कमी होत गेल्याने मतदार विखुरले.

  3. मागील २५ वर्षांत महापालिकेत एकही नगरसेवक निवडून न येणे ही रिपाईसाठी मोठी शोकांतिका ठरली आहे.

Nagpur News : नागपुरात सहासाडेसहा दशकांपूर्वी रिपब्लिकन पक्षाची शक्ती नजरेत भरणारी होती. नागविदर्भ चळवळ, काँग्रेस आणि जनसंघासमोर ‘रिपब्लिकन पक्ष‘ गजराजासारखा उभा होता. मात्र काळ बदलला अन् रिपब्लिकन गट नेत्यांची संख्या वाढली तशी कार्यकर्त्यांची वजाबाकी होत गेली. यामुळे रिपब्लिकन मतदार विखुरला गेला. मागील पंचेविस वर्षांपासून रिपब्लिकन पक्षाचे वैभवशाली दिवस हरवले. रिपाईचा एकही नगरसेवक महापालिकेच्या निवडणुकीत निवडून येत नसल्याची शोकांतिका रिपब्लिकन मतदार अनुभवत आहेत.

तीन ऑक्टोबर १९५७ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आकाराला आला. त्यावेळी नागपुरात रिपाईची शक्तीशाली होता. मात्र अल्पावधित रिपाईचे दुरस्त आणि नादुरस्त असे दोन गट तयार झाले. मात्र तरी मतदार रिपब्लिकन पक्षाच्या पाठीशी उभा होता. यामुळेच १९६२-६३ मध्ये डी.पी.मेश्राम हे नागपूरचे पहिले रिपब्लिकन पक्षाचे महापौर बनले होते. यापुर्वी त्यांनी नागपुरच्या उपमहापौर पदावरही दोन वेळा निवडणून आले होते. यानंतरही रिपब्लिकन विचारधारेचे सखाराम मेश्राम, सखाराम चहांदे, रामरतन जानोरकर, तेजराम सोमंकुवर यांना नागपूर नगरीचे महापौर होण्याचा मान मिळाला होता.

परंतु पुढे रिपब्लिकनांची लोकसंख्या वाढली. परंतु, बदलत्या काळाच्या ओघात रिपब्लिकन नेत्यांना जडलेल्या स्वार्थाच्या गँगरीनमुळे या नेत्यांनी तहाच्या राजकारणातून पक्ष शक्तीहिन केला. २०१२ सालच्या महापालिका निवडणुकीत निळ्या पाखरांचे रिपब्लिकन थवे (विविध गट) आमनेसामने उभे ठाकले आणि महापालिकेच्या बॅलेट पेपरवरून रिपब्लिकन पार्टा ऑफ इंडिया, खोरिपाची शक्ती संपली. भारिप-बहुजन महासंघाला दोन उमेदवार निवडून येत गेले. पुढे तेही संपले.

Republican Party Politics
Municipal Election : निवडणुकीच्या धामधूमीत भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार; मुख्यमंत्र्यांच्या सभेआधीच अंबरनाथ हादरले

बाबासाहेबांचा हत्ती दाखवून बहुजन समाज पक्षाने रिपब्लिकन मतदारांना आपल्याकडे वळवले. बसपचे दहा नगरसेवक निवडून आले. केंद्रीय राज्यमंत्री असलेले रामदास आठवले यांच्या रिपाईची पक्षाची स्थिती ‘मिला तो भी भला ना मिला तो भी भला’ अशी झाली आहे. जागा मिळो अथवा ना मिळो, ते महायुतीशी इमान राखतात. पीपल्स रिपब्लिकन पार्टी (प्रा.जोगेंद्र कवाडे) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या नेत्या ऍड. सुलेखा कुंभारे आतापर्यंत भाजपसोबत होत्या. आता त्या या निवडणुकीत कोणासोबत असतील हे सांगता येत नाही.

काँग्रेसमधील दलित नेत्यांनाच आता रिपब्लिकनांच्या युतीमधे रस नाही. डॉ. राजेंद्र गवई यांच्या रिपाईची शक्ती नागपुरात नाही. येत्या १५ जानेवारीला महापालिकेच्या निवडणुकीत बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी, खोरिप, रिपब्लिकन आघाडी, संयुक्त रिपब्लिकन आघाडी, आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा, रिपब्लिकन फेडरेशन, रिपब्लिकन लोकशाही मोर्चाचे उमेदवार रिपब्लिकन मतांवर दावा करीत निवडणूक लढणार आहेत.

तर रिपब्लिकनांच्या दुसऱ्या फळीने २००७ मध्ये रिपब्लिकन आघाडी तयार केली. ९ नगरसेवक आणि २ समर्थित असे एकूण ११ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे महापालिकेत रिपब्लिकन पक्षाचे दालन तयार झाले होते. मात्र पुढे हे सर्व नगरसेवक सैरभर झाले. यंदाही रिपब्लिकन फेडरेशनने हा प्रयत्न सुरू केलाय. पण तो कितपत यशस्वी होतो, ही येणारी वेळच सांगेल.

Republican Party Politics
Municipal Election : निवडणूक कार्यक्रम जाहीर, पण आयोगाने घातलेली खर्चाची मर्यादा किती? जाणून घ्या एका क्लिकवर

FAQs :

1. नागपुरात रिपब्लिकन पक्ष कधी प्रभावी होता?
➡️ सुमारे सहा-साडेसहा दशकांपूर्वी रिपब्लिकन पक्ष नागपुरात प्रभावी शक्ती होता.

2. रिपब्लिकन पक्षाचा ऱ्हास का झाला?
➡️ नेतृत्वातील गटबाजी आणि कार्यकर्त्यांची संख्या घटल्याने.

3. मागील किती वर्षांत रिपाईचा नगरसेवक नाही?
➡️ मागील सुमारे २५ वर्षांपासून एकही नगरसेवक निवडून आलेला नाही.

4. याचा रिपब्लिकन मतदारांवर काय परिणाम झाला?
➡️ मतदार विखुरले गेले आणि पक्षाची ताकद कमी झाली.

5. भविष्यात रिपब्लिकन पक्षासाठी आव्हाने कोणती?
➡️ एकत्रित नेतृत्व, संघटन बळकट करणे आणि मतदारांमध्ये विश्वास पुनर्स्थापित करणे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com