Nagpur Riots : नागपूरमध्ये दंगल कोणी घडवली? वडेट्टीवारांचा थेट भाजपवरच आरोप

Vijay Wadettiwar BJP Allegations : काँग्रेसच्यावतीने उद्या बुधवारी नागपूर इथं सद्‍भावना यात्रा काढण्यात येणार असून, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथाला प्रामुख्याने सहभागी होणार आहेत.
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar Sarkarnama
Published on
Updated on

BJP Accused in Nagpur Riots: औरंगजेबाच्या कबरीवरून वाद पेटवण्याचे काम सत्ताधाऱ्यांनीच केले. नागपुरात दंगा झाला हे पाप यांचेच आहे, असा थेट आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवारांनी भाजपवर केला. नागपूरमध्ये सर्वच जातीधर्माचे लोक राहतात.

यापूर्वी अशी परिस्थिती कधीच नव्हती. दोन समुदायात द्वेष नव्हता. दोन समाजात भाजपने निर्माण केलेली दर कमी करण्यासाठी काँग्रेस सद्‍भावना यात्रा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेसच्यावतीने (Congress) बुधवारी (ता.16) सद्‍भावना यात्रा काढण्यात येणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथाला हे या यात्रेत प्रामुख्याने सहभागी होणार आहेत.

या पार्श्वभूमीवर वडेट्टीवारांनी दीक्षाभूमी ते ताजबाग अशी यात्रा काढण्यात येणार असल्याचे सांगितले. तत्पूर्वी काँग्रेसने जारी केलेल्या पत्रकात महाल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून यात्रा काढणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Vijay Wadettiwar
Mehul Choksi arrested : 13 हजार कोटींच्या घोटाळ्यातील मेहुल चोकसी बेल्जियमला पोचला कसा? जाणून घ्या, त्याचा छुपा प्रवास...

औरंगजेबाची कबर खणून काढावी यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते. यावरून नागपूरमध्ये (Nagpur) मोठी दंगल उसळली होती. पोलिस आणि लोकांवर दगडफेक करण्यात आली होती. गाड्यांची जाळपोळ करण्यात आली होती. ज्या पद्धतीने दंगल सदृष्य परिस्थिती उद्‍भवली होती त्यावरून यास कोणीतरी बाहेरून फूस दिल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती.

Vijay Wadettiwar
Bihar Election : मोठी राजकीय घडामोड; काँग्रेसबाबत लालूंची रणनीती ठरली, तेजस्वी यादव यांच्याकडून शिक्कामोर्तब

या प्रकरणी मुख्य आरोप फहीम खानच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे घरही पाडण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने औरंगजेबाची कबर हटवणे अयोग्य असून आमचे समर्थन नसल्याचे जाहीर केल्यानंतर आक्रमक झालेल्या संघटना सध्या शांत झाल्या आहेत. मात्र विजय वडेट्टीवारांनी थेट भाजपवरच दंगलीचा आरोप केला. त्यामुळे सद्‍भावने यात्रापूर्वीच वादाला तोंड फुटणार असल्याचे दिसून येते.

विजय वडेट्टीवारांनी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत कपात केल्याने महायुती सरकावर टीका केली. जेव्हा योजना जाहीर केली तेव्हा सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का असा सवाल त्यांनी केला. केंद्र शासनाकडून निधी दिला जातो म्हणून पैस्यात कपात करणे अयोग्य असल्याचे ते म्हणाले.

निराधार महिलांना केंद्र सरकारकडून पंधराशे रुपयांची मदत दिली जाते. या योजनेचा लाभा उचलणाऱ्या महिलांना आता फक्त लाडकी बहीण योजनेंर्गत फक्त पाचशे रुपये दिले जाणार असल्याचे समोर आले आहे. दीड हजार रुपयांमध्ये घर चालते का अशी विचारणा करून वडेट्टीवारांना महायुती सरकारवर आरोप लावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com