communal tension Nagpur : नागपूरमध्ये उसळेल्या दंगलीसोबतच पोलिस व नागरिकांवर झालेली दगडफेक, गाड्यांची जाळपोळ आणि मारहाणी मागच्या अनेक धक्कदायक बाबी समोर येत आहेत. या सर्वांना कोणीतरी चिथावणी दिल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला असून गुरुवारी नागपूरच्या सायबर पोलिस विभागाने नव्याने चार गुन्हे दाखल केले आहेत.
यात एकूण ३४ लोकांना आरोपी करण्यात आले आहे. या सर्वांवर दंगलीस चिथावणी देणे, दंगल घडवण्यासाठी साहित्य गोळा करणे, लोकांना भडकावणे तसेच सोशल मीडियाचा वापर करून दंगलीस प्रोत्साहित करण्याच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
औरंगजेबच्या कबरीला विरोध करण्यासाठी विश्व हिंदू परिषद(VHP) आणि बजरंग दलाच्यावतीने सोमवारी महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर सायंकाळी एका समाजाच्यावतीने यास प्रत्युत्तर देण्यासाठी तुफान दगडफेक केली गेली. या परिसरात रस्त्यांवर उभ्या असलेल्या गाड्या जाळल्या, तोडफोड केली, लोकांना मारहाण केली. जमावाला पांगवण्यासाठी आलेल्या पोलिसांवरसुद्धा दगडफेक केली. त्यामुळे नागपूरची परिस्थिती आणखीच चिघळली होती.
हा सर्व प्रकार घडत असताना हंसापुरी भागात पुन्हा जमावाने तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे बघून पोलिसांनी बळाचा वापर केला. गेल्या तीन दिवसांपासून नागपूर शहरात तणावाची स्थिती आहे. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी तब्बल १२०० लोकांवर गुन्हे दाखल केले आहे. या दंगलीमागचा मास्टरमाईंड फहिम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला आहे.
तसेच या दंगलीमागे बांगलादेशी रोहिंगे असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. एका फेसबुक पोस्टवरून दंगलखोरांना चिथावणी देण्यात आली असल्याचे समोर आले आहे. ही पोस्ट बांगलादेशातून व्हायरल झाली असल्याचे समोर आले आहे. त्या दिशने पोलिसांनी तपास सुरू केला असून सायबर क्राईम विभागाने एकूण चार नवीन गुन्हे दाखल केले आहेत.
आक्षेपार्ह पोस्ट टाकणे, लोकांची डोकी भडकावे, जमाव गोळा करण्यास प्रोत्साहित करणे, हिंसाचार घडवण्यासाठी साहित्य गोळा करण्यास मदत करणे आदी विविध कलमं अज्ञात आरोपींच्या विरोधात दाखल करण्यात आल्या आहेत. हे चारही गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.