Nagpur University Vice Chancellor Suspended : राज्यपालांच्या नोटीसीला आव्हान देणं, नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंना भोवलं!

Nagpur University Vice Chancellor Subhash Chaudhary : कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी वर्षभरात दोनवेळा झाले निलंबित; नियुक्तीपासून सापडले होते वादात
Subhash Chaudhary
Subhash ChaudharySarkarnama

Nagpur University Vice Chancellor Suspended News : राज्यपालांनी बजावलेल्या नोटीसीला उच्च न्यायलयात आव्हान देणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना चांगलेच महागात पडले. प्रशासनाने त्यांना गुरुवारी तडकाफडकी निलंबित केले आहे. विशेष म्हणजे ते वर्षभरात दोन वेळा निलंबित झाले आहेत.

नागपूर विद्यापीठात चौधरी(Subhash Chaudhary) यांची नियुक्ती झाली तेव्हापासूनत ते वादात सापडले होते. सत्ताधारी भाजपच्याही पदाधिकाऱ्यांचा त्यांनी रोष ओढावून घेतला होता. यातच काही अनियमितीतचे प्रकार समोर आले. नागपूर विद्यापीठाने ब्लॅकलिस्ट कंपनीला पुन्हा पेपर तपासणीचे काम दिले होते. यावरून मोठा वादंग झाला होता.

Subhash Chaudhary
Monsoon Session 2023 : आमदार प्रवीण दटकेंनी वाढवल्या कुलगुरू सुभाष चौधरींच्या अडचणी !

भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी या विरोधात विधान परिषदेत आवाज उठविला होता. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील(Chandrakantada Patil) यांनी कुलगुरुंच्या निलंबनाची घोषणा सभागृहात केली होती. मात्र चौधरी यांनी हार मानली नाही. त्यांनी चंद्रकांत दादा पाटील यांनाच आव्हान दिले. विद्यापीठांचे प्रमुख राज्यपाल असतात. त्यामुळे एखाद्या मंत्र्यांना कुलगुरुंना निलंबित करण्याचा अधिकार नसल्याचे त्यांचे म्हणणे होते.

Subhash Chaudhary
Nagpur University News : कुलगुरूंवर निलंबनाची तलवार, ओबीसी विरुद्ध सवर्ण रंग देऊन प्रकरण दडपण्याचे प्रयत्न !

या दरम्यान राज्यपालांनी उपशिक्षणाधिकारी अशोक मांडे यांची एकसदस्यीय समिती नेमली होती. दरम्यान राज्यपालांनी बाजावलेल्या नोटीसला कुलगुरू चौधरी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अद्याप या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. मांडे समितीने चौकशी अहवाल राज्यपालांकडे सादर केला. त्यानुसार न्यायालयाचा निकाल यायच्या आधाची गुरुवारी कुलगुरु चौधरी यांना निलंबित करण्याचे आदेश नागपूर विद्यापीठात(Nagpur University) धडकले.

Subhash Chaudhary
Nagpur BJP News : लोकसभेत मतदानात फटका बसल्यानंतर, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नागपूर भाजप दक्ष!

कुलगुरू चौधरी यांच्या विरोधात नागपूर विद्यापीठाची सिनेट समितीसुद्धा होती. समितीच्यावतीनेसुद्धा अनेक तक्रारी यापूर्वीच राज्यपालांकडे केल्या आहेत. भाजपची एक संघटना कुलगुरू यांच्या बाजूने तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद त्यांच्या विरोधात होती.

एकूणच राज्यपाल, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, आमदार आणि सत्ताधारी भाजपसोबत पंगा घेतल्याने कुलगुरू चौधरी अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. कुलगुरू चौधरी यांचा स्वभाव बघता ते निलंबनाला पुन्हा उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com