Nagpur Violence : नागपूर राडा प्रकरण: मुंबई हायकोर्टाच्या निकालानंतर तब्बल 80 जणांना एकाच दिवशी जामीन

Controversy Aurangzeb's Tomb : नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा राडा झाला होता. महाल परिससरात मोठी दगडफेकीसह अनेकांच्या गाड्या जाळण्यात आल्या होत्या. या राड्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठा वाद रंगला होता.
Nagpur Violence
Nagpur ViolenceSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये मोठा राडा झाला होता. महाल परिससरात मोठी दगडफेक झाली होती. तर अनेकांच्या गाड्या जाळण्यात आल्या होत्या. या राड्यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठा वाद रंगला होता. यावरून एकमेकांना जबाबदार ठरवले जात होते. याप्रकरणी नंतर पोलिसांनी शंभरच्यावर राडेबाजांवर गुन्हे दाखल केले होते. मुख्य सूत्रधार फहीम खान याच्यावर देषद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान यातील नऊ जणांची अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामिनावर सुटका केली होती. तर आता याच निकालाचा आधार घेऊन जिल्हा सत्र न्यायालयाने तब्बल 80 जणांना सशर्त जामीन दिला आहे. या राड्यातील कथित सूत्रधार फहीम खान याला अद्याप जामीन मंजूर करण्यात आलेला नाही. (Nagpur Aurangzeb tomb violence case sees 80 accused get bail)

या प्रकरणात न्यायाधीश ए. आर. कुलकर्णी यांनी निर्णय दिला. उच्च न्यायालयाने अलीकडेच मो. राहील झाकिर खान आणि अन्य आठ जणांची जामिनावर मुक्तता केली आहे. यानंतर मोहम्मद हारीश मो. इस्माईल, मो. शाहनवाज शेख, मो. युसूफ शेख, नसीम सलीम शेख आणि अन्य 76 अशा तब्बल 80 आरोपींनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केले होते.

महाल परीसरात झालेल्या दंगलीतील मुख्य आरोपी व कथित सूत्रधार फहीम शमीम खान (वय-38 रा. संजयबाग कॉलनी, नागपूर) याच्यासह अनेक आरोपींवर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. परंतु, पोलिसांनी कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय आम्हाला अटक केली. केवळ गुप्त माहितीचा आधार घेतल्याचे पोलिसांनी नमूद केले.

Nagpur Violence
Nagpur Violence: नागपूर दंगलीतील देशद्रोहाचा आरोप असलेल्या हमीद इंजिनिअरला जामीन मंजूर

मुख्य म्हणजे, घटनेतील मुख्य सूत्रधार फहीम खानच्या सनी युथ फोर्सच्या व्हॉट्सॲप समूहाचे देखील आम्ही सदस्य नाहीत, ओळख परेडमध्ये देखील आमची ओळख पटली नाही. त्यामुळे, जामीन मंजूर करण्याची विनंती या आरोपींनी केली होती. अखेर सत्र न्यायालयाने आज तब्बल 80 आरोपींचे जामीन अर्ज मंजूर केले.

Nagpur Violence
Nagpur violence : दंगलीत फक्त मुस्लिम समाज टार्गेट..., नागपूरमध्येच काँग्रेस नेत्याचे फडणवीसांवर गंभीर आरोप

आरोपींतर्फे ॲड. आसिफ कुरेशी, ॲड. रफीक अकबानी, ॲड. अश्विन इंगोले, ॲड. शाहबाज सिद्दीकी आदींनी बाजू मांडली. तर, शासनातर्फे जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी बाजू मांडली. या सर्व 80 आरोपींची प्रत्येकी एक लाख रुपये जातमुचलक्यावर सशर्त सुटका करण्यात आली आहे. अटीनुसार, आरोपींनी आठवड्याला दोनदा पोलिस ठाण्यात हजेरी लावणे लावावी लागणार आहे. एकाच प्रकरणातील तब्बल 80 जणांचे एकाचवेळी जामीन मिळण्याच्या नागपूर सत्र न्यायालयाच्या नजीकच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com