नाना पटोले म्हणाले, विदर्भात शिवसेनेचे स्वागत आहे...

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यामुळे राजकारणातील भाषेचा स्तर खालावला आहे, असा घणाघात नाना पटोले (Nana Patole) यांनी केला.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

भंडारा : विदर्भात शिवसेना नजीकच्या काळात मोठे संघटनात्मक बदल करीत आहे. यासंदर्भात माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे. येणाऱ्या काळात माझ्या नागपुरातील चकरा वाढणार आहेत, असे वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज नागपुरात केले. याबद्दल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारणा केली असता, विदर्भात शिवसेनेचे स्वागत आहे, असे उत्तर त्यांनी मिश्‍किलपणे दिले.

महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तिन्ही पक्ष स्वतंत्र लढल्यास येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेना (Shivsena) कॉंग्रेसचा प्रबळ प्रतिस्पर्धी ठरेल का, या प्रश्‍नावरही त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया देत पुढच्या प्रश्‍नाकडे वळणे पसंत केले. आज भंडारा (Bhandara) येथे आले असता, पत्रकारांशी नाना पटोले (Nana Patole) बोलत होते. १० मार्चनंतर सरकार सुधरवणार, असेही नाना मागील दौऱ्यात बोलले होते. त्यानंतर महाराष्ट्रात (Maharashtra) बदलासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीसुद्धा १० मार्च ही तारीख निश्‍चित केली आहे. याबद्दल विचारले असता, या प्रश्‍नाला त्यांनी सोयीस्करपणे बगल दिली.

महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर खालावला..

एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाचा आदर्श इतर राज्य घेत होते. मात्र आता असं होताना दिसत नाही. पहाटे स्थापन केलेली सरकार अल्पजीवी ठरल्याने ते भांबावले आहेत. स्वतः सत्तेत नसल्यामुळे ते सरकारची बदनामी करण्याचे षड्यंत्र रचत असतात. त्यांच्यामुळेच आज राजकारणाचा स्तर खालावला आहे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राजकारणातील भाषेचा स्तर खालावला आहे, असा घणाघात नाना पटोले यांनी केला.

भाजपची सत्ता नकोशी झाल्यावर आम्ही एकत्र आलो..

ममता बॅनर्जी देशात भाजपविरोधी आघाडी तयार करीत आहेत. पण आघाडीत कॉंग्रेसला सोबत घेण्याच्या विरोधात त्या आहेत आणि तसे प्रयत्न केले जात आहेत. या वृत्ताचे नाना पटोले यांनी खंडन केले. चंद्रशेखर राव यांच्याशी माझे बोलणे झाले. मी दौऱ्यावर असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यांनी काही मुद्दे मांडले आहेत. आम्ही स्त्री शक्तीचा अपमान करणाऱ्या मनुवादी व्यवस्थेविरोधात एकत्र आल्याचे पटोले म्हणाले.

Nana Patole
काँग्रेसला वगळून भाजपविरोधी आघाडी होवू शकत नाही : नाना पटोले

भाजपवाल्यांच्या आरोपांमुळे केवळ मनोरंजन होतेय...

महाविकास आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप लावणे, राज्यातील सरकारला बदनाम करणे पर्यायाने महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम करणे, हे धंदे भाजपने चालविले आहेत. हे आता कुठेतरी बंद झाले पाहिजे. कारण भाजपवाल्यांच्या आरोपांमुळे मनोरंजनाशिवाय काहीही होत नाहीये. अजूनही ते मुख्यमंत्र्यांचे १९ बंगले दाखवू शकले नाहीत. भाजप नेते तेथे गेले असता, ते १९ बंगले गायब झाले, असे हास्यास्पद वक्तव्य करण्याची वेळ त्यांच्यावर आली, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com