नाना पटोले म्हणाले, हा जागतिक पातळीवर भारताला टार्गेट करण्याचा प्रयत्न !

३७० हे काय प्रकरण हे शेवटपर्यंत लोकांना कळलेच नाही आणि ३७० कलम हटवल्यानंतर काय परिस्थिती झाली, हे देश पाहतो आहे, असे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : भाजप हा संविधानाला न मानणारा पक्ष आहे. भाजपच्या दोन प्रवक्त्यांनी मोहम्मद पैगंबरांबद्दल अपशब्द वापरून जागतिक पातळीवरून भारताला टारगेट करण्याचा प्रयत्न केला. जागतिक पातळीवरून दबाव आल्यानंतर कुठे भाजपने दोन प्रवक्त्यांना निलंबित केले, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज येथे म्हणाले.

संविधानाने प्रत्येकाला आपआपल्या धर्मावर प्रेम करण्याचा अधिकार दिलेला आहे. पण दुसऱ्याच्या धर्मावर टिका करण्याचा अधिकार कुणालाही नाही. भारताचा (India) अपमान करण्याचा अधिकार भाजपला (BJP) कुणी दिला, असा प्रश्‍न आता विचारला जात आहे. भाजप प्रवक्त्यांच्या त्या वक्तव्यानंतर भारतातील कुठलीही वस्तू आम्ही आता घेणार नाही, असा दबाव जेव्हा जागतिक पातळीवरून आला आणि भारताशी संबंध तोडण्याची भूमिका जगभरात घेण्यात आली त्यानंतर भाजपने त्यांच्या नूपुर शर्मा (Nupur Sharma) आणि नवीन जिंदल या दोन प्रवक्त्यांना निलंबित केले. नाहीतर आताही त्यांचे लांगूलचालन सुरू राहिले असते, असे नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले.

भाजपने सतत संविधानविरोधी भूमिका घेतली आहे, हे गत ८ वर्षांत देशवासीयांनी बघितले आहेच आणि आता मोहम्मद पैगंबरांबद्दल अपशब्द वाढवून भाजपने भारतासह जगभरातील लोकांचा रोष ओढवून घेतला आहे. भारतात तर आता लोक भाजपला वाडीत टाकतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जेव्हा भाजप सत्तेत नव्हती, तेव्हा ते सतत सांगत हो, की आम्ही सत्तेत आलो की, कलम ३७० हटवू. ३७० हे काय प्रकरण हे शेवटपर्यंत लोकांना कळलेच नाही आणि ३७० कलम हटवल्यानंतर काय परिस्थिती झाली, हे देश पाहतो आहे.

Nana Patole
नाना पटोले म्हणाले, भाजपच्या गर्वाचे लवकरच हरण होईल...

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्‍मीरमध्ये भाजप निवडणुका घेऊ शकत नाहीये. अजूनही तेथे राष्ट्रपती राजवट सुरू आहे. काश्मिरी पंडितांच्या विषयावर राजकारण करून भाजपच्या लोकांना आपल्या पोळ्या शेकल्या आणि आज काश्मिरी पंडितांवर तेथे अत्याचार केले जात असताना ते त्यांचे संरक्षण करू शकत नाहीये. काश्मिरी पंडितांना टारगेट करून त्यांचे खून केले जात आहेत आणि अशा परिस्थितीतही ते केवळ ‘काश्‍मीर फाईल्स’ सिनेमाचे प्रमोशन करण्यात गुंतलेले आहेत, असा घणाघात नाना पटोले यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com