Sanjay Gaikwad Shiv Sena : 'ठेचा, गोळ्या घाला, हा नराधम मातृभूमीवर जगता कामा नये'; राज्य, देश, धर्म कलंकित करणाऱ्या अशोक खरातवर शिंदेच्या शिलेदाराचा संताप

Shiv Sena MLA Sanjay Gaikwad from Buldhana lashes out at Nashik Ashok Kharat over alleged fraudulent activities : नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्या करारनाम्यावर एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदा संजय गायकवाड यांनी संताप व्यक्त केला.
Sanjay Gaikwad Shiv Sena
Sanjay Gaikwad Shiv SenaSarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat Nashik fraud : तत्कालीन मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याला झालेल्या काॅलची हिस्ट्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी समोर आणली. यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

एकनाथ शिंदे शिवसेनेचे बुलढाणा इथले आमदार संजय गायकवाड यांनी, यावरून भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. 'ठेचा, गोळ्या घाला, असा नराधम मातृभूमीवर जगता कामा नये,' अशी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.

संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) म्हणाले, "या भोंदूबाबामुळे देश, राज्य, धर्म बदनाम झाला आहे. या महाराजाने, जे धंदे केलेत ते, जर यापूर्वी समजले असते, तर बऱ्याच महिला त्याच्यापासून वाचल्या असत्या. देवी-देवाच्या आणि धर्माच्या नावाने, आयएएस व आयपीएसच्या महिला जात होत्या, त्यांना बरबाद केल आणि वरून तो सांगतो की हा माझ्या पूजा प्रक्रियेचा भाग होता म्हणून."

नाशिक (Nashik) इथल्या भोंदूबाबा अशोक खरात याची प्रकृतीवर हल्ला चढवताना, ठेचून काढली पाहिजे, गोळ्या घातल्या पाहिजे, असा नराधम या मातृभूमीवर जगता कामा नाही, अशी संतापजनक प्रतिक्रियाही आमदार गायकवाड यांनी दिली. कालीचरण महाराज यांनी देखील, यापूर्वी अशोक खरात दोषी असेल, तर चौकात ठेचून, गोळ्या घाला, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली होती.

Sanjay Gaikwad Shiv Sena
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात एकनाथ शिंदेंचीही चौकशी होणार? 2022 मधील विखे पाटील, केसरकरांसोबतचा दौरा वादात

'अशोक खरात याच्या संपर्कातील मंत्री, आमदार यावर बोलताना, दीपक केसरकर गेले, इतके आमदार गेले, 17 काॅल गेले, किंवा सतराशे साठ काॅल जाऊ दे, आमच्यासारख्या नेत्यांबरोबर अनेक लोक फोटो काढतात, आम्हाला काय माहित हा आतंकवादी होता की बाबा निघणार आहे. पण संपर्कातील लोकांचा त्याच्या या कृत्यात डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट संबध असेल, तर त्यांना नक्कीच कारवाई करा, शिक्षा करा,' असेही आमदार गायकवाड यांनी म्हटलं.

Sanjay Gaikwad Shiv Sena
Fake Baba : अशोक खरातवरून कालीचरण महाराजांचा संताप अन् हसत सुटले..; म्हणाले, 'भर चौकात डोक्यात...'

...तर तो गुन्हेगार आहे

'फक्त एका फोटो आहे म्हणून कारवाई करा, कश्याकरता, तर लोकप्रतिनिधी आहे म्हणून, विनाकारण पक्ष द्वेष म्हणून कारवाई करा हे योग्य नाही. शिवसेना अन् भाजप, हिंदू मानणारे पक्ष आहेत. जागोजागी मंदिरे उभारणारे पक्ष आहेत. पूजा अर्चा करण्यारे पक्ष आहेत. केसरकर किंवा आम्ही कुठेही मंदिर दिसले की, आम्ही गाडी थांबवू दर्शन घेतो. एखाद्या माणसाने भावनिक होणे गुन्हा आहे का? हा जेव्हा त्याला सर्व माहिती असेल किंवा पाहिले असेल, माहिती असून सुद्धा जात असेल, तर तो गुन्हेगार आहे. त्याला हे माहितच नाही. त्याचे पाप नंतर उघडे झाले असतील, अगोदरचे फोटो दाखवत असाल त्याला काहीही अर्थ नाही,' असेही गायकवाड यांनी स्पष्ट केलं.

एकनाथ शिंदेंचं नाव घेताना सावधान...

एकनाथ शिंदे यांचे अशोक खरात याला 17 कॉल झाले. यावर बोलताना, सतराशे साठ काॅल होऊ देत, दमानिया बाई यांनी सतराशे साठ कॉल तपासावेत. एकनाथ शिंदे साहेबांनी राज्यातील लाखो करोडो लाडक्या बहिणचं हित जोपासलं. अशा भानगडीत राहू शकते का? कोणावराही टिका करायची आणि मोठ व्हायचं हा, या बायाचा धंदाच आहे. यापुढे या लोकांनी एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेतलं, तर खबरदार, राहिले पाहिजे या बायांनी, असा इशारा देखील आमदार गायकवाड यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com