Mahayuti Politics : प्रफुल्ल पटेल यांच्या घोषणेनं अनेकांच्या भुवया उंचावल्या...

Nationalist Congress Party Praful Patel Mahayuti Lok Sabha 2029 elections : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी 2029लोकसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे.
Praful Patel
Praful PatelSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : भविष्यात महायुती कायम राहणार की नाही, याबाबत अद्याप कोणालाच खात्री देता येत नसली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्‍ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आतापासूनच 2029ची लोकसभेची निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली.

लोकसभेच्या निवडणुकीला सुमारे साडेचार वर्षे बाकी असताना पटेलांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

प्रफुल्ल पटेल यांनी 2024 निवडणूक लढली नव्हती. त्यापूर्वीच्या निवडणुकीत त्यांचा भाजपचे (BJP) उमेदवार सुनील मेंढे यांनी पराभव केला होता. पराभव झाल्यानंतर लगच शरद पवार यांनी त्यांना राज्यसभेवर नियुक्त केले होते. अजित पवार यांच्यासोबत बाहेर पडून त्यांनी शरद पवार यांना सोडचिठ्ठी दिली. त्यांचा बराच कार्यकाळ बाकी असताना त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आणि नव्याने राज्यसभेची निवडणूक लढवली. त्यांचा सुमारे पाच वर्षांचा कार्यकाळ अद्यापही बाकी आहे.

Praful Patel
Santosh Deshmukh Murder Case : घुले, आंधळे अन् सांगळे 'वाँटेड'; पोलिस चप्पा चप्पा छान रही है!

अजित पवार महायुतीत (Mahayuti) सहभागी झाल्यनंतर विदर्भाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पराभूत करू शकले नाही. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत प्रफुल्ल पटेल यांनी आपले वर्चस्व दाखवून दिले. मात्र नाना पटोले यांना पराभूत करण्याची संधी त्यांची थोडक्यात हुकली. नाना पटोले 'ईव्हीएम'मध्ये पराभूत झाले होते. मात्र त्यांना पोस्टल बॅलेटने तारले. त्यांच्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार निवडून आले आहेत. ते राज्यसभेत राहून भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे नेतृत्व करतील अशी अपेक्षा असताना त्यांनी आपण आगामी लोकसभेची निवडणूक लढणार असल्याची घोषणा करून सर्वांनाच धक्का दिला.

Praful Patel
Maharashtra Poverty Alleviation : महाराष्ट्रातील दारिद्र्य निर्मूलनाचे नेमकी कोणती आव्हानं...

2029मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे. काही मतदारसंघाची वाढही होणार आहे. याकरिता विधानसभा मतदारसंघाची तोडफोड करावी लागणार आहे. सर्वच परिस्थिती अस्थिर व अनिश्चित असताना प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सध्या भंडारा-गोंदिया जिल्हात महाविकास आघाडीचा खासदार आहे. भाजपचे माजी खासदार सुनील मेंढे यांना केंद्रात मोदी सरकार असतानाही आपला मतदारसंघ राखता आला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत ते आपल्या परंपरागत मतदारसंघावर दावा करतील आणि भाजपला सोबत घेतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियातली आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी गप्पा मारताना निवडणूक लढणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी महायुती भविष्यात कायम राहील तसेच महायुतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह धानाला बोनस देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण केली जाईल, असाही विश्वास व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com