Amravati News : एकीकडे अधिवेशन तर दुसरीकडे अमरावतीत 4 हजारांवर अंगणवाडी सेविका संपावर

Anganwadi Sevika Service Issue : मानधनाच्या मुद्द्यावर पुन्हा घेतली आंदोलनात्मक भूमिका
Anganwadi Sevika Service Issue
Anganwadi Sevika Service Issue Sarkarnama
Published on
Updated on

Amravati News : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होताच पुन्हा एकदा अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना मिळणाऱ्या मानधनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अमरावती जिल्ह्यातील सुमारे चार हजारांवर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मानधन वाढीच्या मागणीसाठी संपावर गेल्या आहेत. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार अंगणवाड्यांना टाळं लागलं आहे.

शासकीय कर्मचाऱ्याच्या दर्जाची मागणी अंगणवाडी सेविकांनी (Anganwadi Sevika) केली आहे. अंगणवाडी सेविकांना 26 हजार आणि मदतनीसांना 20 हजार रुपये मानधन देण्यात यावं, अशी त्यांची मागणी आहे. याशिवाय त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जाही हवा आहे.

Anganwadi Sevika Service Issue
Devendra Fadnavis:"...म्हणून नवाब मलिकांना 'महायुती'त घेता येणार नाही!"; फडणवीसांचं अजितदादांना पत्र

वारंवार मागणी केल्यानंतरही शासन यासंदर्भात निर्णय घेत नसल्याने अमरावती जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी बेमुदत संप (Strike) सुरू केला आहे. गुरुवारी (ता.7) अंगणवाडी सेविकांनी आक्रमक भूमिका घेत एल्गार पुकारला. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या राज्य तसेच केंद्र शासनाकडे अनेक मागण्या प्रलंबित आहेत. याबाबर वारंवार आंदोलनं करण्यात आली, परंतु आश्वासनांशिवाय त्यांना काही मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी बेमुदत संप पुकारत मोर्चा काढला.

अमरावती काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांचा जिल्हा आहे. आमदार यशोमती ठाकूर या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महिला व बालविकासमंत्री होत्या. आपल्या कार्यकाळात त्यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, परंतु अनेक मुद्दे प्रलंबित असतानाच महाविकास आघाडी सरकार कोसळलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यानंतर सत्तेवर आलेल्या भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महायुती सरकारकडे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी आपल्या मागण्या मांडल्या. मात्र, महायुती सरकारनं कोणताही निर्णय न घेतल्याने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संपावर गेले आहेत.

मानधन वाढीचा हा प्रश्न केवळ एकट्या अमरावती जिल्ह्यापुरता मर्यादित नसून राज्यातील अन्य अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचाही हाच मुद्दा आहे. सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे मानधनाच्या रकमेत वाढ करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. कामाच्या मोबदल्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणारे मानधन कमी आहे.

Anganwadi Sevika Service Issue
Kalyan Lok Sabha BJP : 'कल्याण'ची मोहीम भाजप फत्ते करणार ? 'या' महिला पदाधिकाऱ्याकडे मोठी जबाबदारी

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात कुपोषणाचं प्रमाण आजही बऱ्यापैकी कायम आहे. अशात दुर्गम भागातील गावांमध्ये जात सेवा देण्याचं काम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस करीत आहेत. त्यानंतरही त्यांना योग्य मानधन मिळत नसल्याने सध्या अंगणवाडी सेविका व मदतनीस नाराज आहेत. काही अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणारे मानधन विलंबाने त्यांच्या खात्यात येत असल्याने त्याबद्दलही त्यांचा रोष दिसून आला. यासंदर्भात सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी गुरुवारी झालेल्या आंदोलनातून करण्यात आली.

(Edited By Deepak Kulkarni)

Anganwadi Sevika Service Issue
Kalyan Lok Sabha BJP : 'कल्याण'ची मोहीम भाजप फत्ते करणार ? 'या' महिला पदाधिकाऱ्याकडे मोठी जबाबदारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com