Amravati News : अमरावती लोकसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीने नवनीत राणा यांच्या विजयासाठी पूर्ण ताकद पणाला लावली. पण तरीही राणांचा पराभव झाला.हा पराभव अजूनही त्यांच्या पचनी पडला नसल्याचे कित्येकदा त्यांच्या वक्तव्यांमधून समोर आले आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांना एकीकडे विधानसभा निवडणुकीत उतरवण्याच्या चर्चा जोर धरू लागल्या असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांना पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे.
माजी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या घरी धमकीचं पत्र आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या पत्रात नवनीत राणा यांना सामूहिक अत्याचारासह 10 कोटी रूपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. याचवेळी राणा दाम्पत्याच्या अमरावतीमधील निवासस्थानाबाहेर गाय कापण्याची देखील धमकी पत्रातून देण्यात आली आहे.
हे पत्र हैदराबादहून आलं असून ते पाठवणार्याचं नाव आमिर असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तान जिंदाबाद असाही उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. याबाबत आता रवी राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी अमरावती शहरातील राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, राणा यांना आलेल्या धमकीमुळे एकच खळबळ उडाली आहे.
राणा दाम्पत्याविषयी वादग्रस्त शब्दांचा वापर करण्यात आला असून मी हैदराबादचा आहे असेही त्याने सांगितले. तसेच,मी कोणत्याही पार्टीचा नाही. माझा भाऊ वासिम ह्याने दुबईतून तुम्हाला कॉल केला होता. मात्र,तुम्ही तो फोन उचलला नाही,असे म्हणत संबंधिताने या पत्रात दुबाईतील भावाचा फोन नबंरही उल्लेख केला आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आठ दिवसांत घोषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकसभेला पराभूत झालेल्या भाजप उमेदवार या विधानसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, आमदार रवी राणा यांनी या चर्चा फेटाळून लावत नवनीत राणा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले.
रवी राणा (Ravi Rana) म्हणाले, नवनीत राणा या भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. मात्र, त्या स्वतः निवडणूक लढणार नाही. 'भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी, नेत्यांनी नवनीत राणा यांना राज्यसभेवर संधी देणार असल्याचे आधीच सांगितले आहे. नवनीत राणा या राज्यसभेवर जाणार आहेत. मला वाटते त्यांच्यासाठी राज्यसभाच योग्य आहे', असे देखील रवी राणा यांनी म्हटले.
काही दिवसांपूर्वीच माझ्या पराभवामुळे अनेकांना आनंद झाला आहे. मात्र, वेगळ्याच गोष्टीचे मला दुःख आहे. माझी अमरावती 10 वर्षे मागे जात आहे हे पाहून मला खूप वेदना होत आहेत, असे सांगत लौटेंगे फिर एक दिन उसी अंदाज में! कई बादल छाने से सूरज का अस्तित्व खत्म नहीं होता, अशी शेरोशायरी करत नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.