Navneet Rana Garba : अमरावतीच्या 'भाभीं'चा गरबा तुफान व्हायरल, धमक्यांना न जुमानता धरला गाण्यांवर फेर !

Amravati Navnit Rana : नवनीत राणा प्रत्येक सण उत्सव उत्साहात साजरा करतात.
Navnit Rana
Navnit RanaSarkarnama

Amravati District Political News : आपल्या वक्तव्यांमुळे संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेच्या विषय ठरलेल्या आणि अंबानगरीत नवनीत भाभी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांचा गरबा नृत्याचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमांवर तुफान व्हायरल झालाय. (Navneet Rana celebrates every festival with enthusiasm)

राजकीय वादामुळे राणा दाम्पत्याला अनेकदा धमक्या मिळाल्या आहेत. रवी राणा यांच्यावर हल्लाही झाला होता. परंतु, या सर्व धमक्यांना न जुमानता खासदार नवनीत राणा अमरावतीमधील नवदुर्गा मंडळांना भेटी देत आहेत. काही ठिकाणी गरबा नृत्यांवर त्यांनी फेरही धरला. नवनीत राणा प्रत्येक सण उत्सव उत्साहात साजरा करतात.

गेल्या वर्षीदेखील नवरात्र उत्सवात त्यांनी नृत्य केले होते. त्यावेळी त्यांनी येथील एका स्टॉलवर 'बुढ्ढी के बाल' बनवले होते. 'बुढ्ढी के बाल' बनवतानाचा त्यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. यंदाही त्यांनी नवरात्र उत्सवाचा मनसोक्त आनंद लुटला आहे. आदिवासी वस्ती असो की शहरातील कॉलनी.

अशा अनेक समाज घटकांच्या उत्सवांमध्ये खासदार नवनीत राणा सक्रियपणे सहभाग घेतात. मेळघाटातील त्यांच्या आदिवासी नृत्याचा व्हिडिओही बराच व्हायरल झाला होता. अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्याशीही त्यांनी एका कार्यक्रमात नृत्य करताना चांगली स्पर्धा केली होती.

तरुणाईमध्ये राणा दाम्पत्याची 'क्रेझ'

राजकीय वर्तुळात येण्याआधी नवनीत राणा अभिनेत्री होत्या. त्यांनी तेलगू, तामिळ आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिनयाच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास २४ चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्यात. त्यावेळीही त्या चर्चेत असायच्या. बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांच्यासोबत विवाह झाल्यानंतर नवनीत राणा यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. आपल्या पतीसाठी व स्वतःसाठी प्रचार करताना नवनीत राणा यांनी अनेकदा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

नवनीत राणा यांच्या अभिनेत्री असण्याच्या कार्यकाळावरही त्यांच्या राजकीय विरोधकांनी बरीच टीका केली. आताही ज्या पद्धतीने त्या जनतेमध्ये सक्रियपणे सहभागी होतात, त्यावरूनही राणाविरोधक त्यांना लक्ष्य करीत असतात. परंतु या सर्व टीकाकारांकडे दुर्लक्ष करीत खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांचा जनतेमधील वावर कायम आहे. तरुणाईसाठी करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या आयोजनांमुळेच आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्याबद्दल अमरावतीच्या तरुणाईच्या मनातील 'क्रेझ' अद्यापही कायम आहे.

Navnit Rana
Navnit Rana Bullet Ride : रामनवमीनिमित्त नवनीत राणांची बुलेट स्वारी, पाहा खास फोटो!

कोणत्या क्षणी काय केल्याने लोकांचे लक्ष वेधून घेता येते व मतदारांचे मन जिंकता येते, ही बाब राणा दाम्पत्याला पूर्णपणे कळली आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही आटापिटा केला तरी अमरावतीच्या 'पब्लिक'ला जे भावते तेच आमदार रवी राणा व नवनीत राणा करत असतात, असे त्यांच्या बाबतीत राजकीय विश्वात बोलले जाते. त्यामुळे रुपेरी पडदा असो, की संसदेचे रेड कार्पेट खासदार नवनीत भाभी राणा सध्या तरी  'हिट' आहेत.

Edited By : Atul Mehere

Navnit Rana
Navnit Rana : न तुटलेल्या भारताला जोडायला निघाली कॉंग्रेस, त्यांनी आधी आपला पक्ष जोडावा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com